Nashik Politics : Bhamre , chavan aiming for higher berth | Sarkarnama

केंद्रीय मंत्रीमंडळ विस्तारात डॉ. भामरेंना बढतीची   तर चव्हाणांना मंत्रिपदाची आशा !

संपत देवगिरे : सरकारनामा ब्युरो
बुधवार, 16 ऑगस्ट 2017

नाशिक  :  केंद्र आणि राज्य शासनाच्या मंत्रीमंडळाचा विस्तार येत्या महिनाभरात अपेक्षित आहे. या बातम्यामुळे अनेक इच्छुक पुन्हा सक्रीय झाले आहेत. 

उत्तर महाराष्ट्रातून केंद्रात डॉ. सुभाष भामरे यांना बढती तर हरिश्‍चंद्र चव्हाण यांना स्थान मिळावे अशी त्यांच्या समर्थकांची अपेक्षा आहे. केंद्रात शिवसेना, संयुक्त जनता दलाला स्थान मिळेल अशी शक्यता आहे . त्यामुळे शिवसेनेच्या खासदारांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. 
 
 केंद्रात तसेच राज्यातही मंत्रीमंडळाचा विस्तार होऊ घातला आहे. उत्तर महाराष्ट्रातून भाजपचे सहा तर शिवसेनेचे दोन खासदार आहेत. धुळ्याचे डॉ. सुभाष भामरे सध्या संरक्षण राज्यमंत्री आहेत. त्यांना बढती अपेक्षीत आहे. तर हरिश्‍चंद्र चव्हाण  (दिंडोरी) आणि डॉ. दिलीप गांधी (नगर) हे तीन टर्म निवडून आलेले खासदार आहेत. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातून या दोघांनाही आपली मंत्रीमंडळात वर्णी लागेल अशी आशा  आहे. या दोन्ही खासदारांनी पक्षाध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली आहे. 

खासदार  समर्थकांनी वरिष्ठ नेत्यांकडे पाठपुरावा सुरु केला  आहे. त्यामुळे आगामी मंत्री मंडळ विस्तारात उत्तर महाराष्ट्र आणि नाशिकच्या अपेक्षा कितपत फलद्रुप होतील हे मंत्रीमंडळ विस्तारातच स्पष्ट होईल. 

दरम्यान , खासदार चव्हाण यांच्यावर उद्या (ता.17) नवी दिल्लीत शस्त्रक्रीया होणार आहे. 
 
 मुंबईत भारतीय जनता पक्षाच्या राज्य कार्यकारीणीची बैठक उद्या (ता.17) होत आहे. या बैठकीतही राज्य मंत्री मंडळात आपली वर्णी लागावी यासाठी इच्छुक लॉबिंग करण्याची शक्यता आहे . याबाबत पडद्याआड चर्चा होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे विविध इच्छुक सक्रीय झाले आहेत. 

 नाशिकला भाजपचे डॉ. राहूल आहेर, बाळासाहेब सानप, सीमा हिरे, प्रा. देवयानी फरांदे हे चार आमदार आहेत. आमदार सानप यांना यापूर्वीच अनुसूूचीत जाती, जमाती समितीच्या अध्यक्षपदी नियुक्त केले आहे. उर्वरीत तीनही आमदार मंत्रीपदासाठी इच्छुक आहेत. त्यासाठी तिन्ही आमदार प्रयत्नशील आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख