नाशिकचे पोलिस आयुक्त सिंघल करणार अमेरिकेत 4300 किलोमीटर सायक्‍लींग

आव्हान देणारा अंगावर येणाऱ्या चढणीचा महाबळेश्‍वरचा घाट... धारवाडची अवघड चढाईची वळणे... गोव्यातील कठीण घाट.... यावर यशस्वी चढाई करीत पुणे- गोवा ही 433 किलोमीटरची सायकल स्पर्धा पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी अडतीस तासांत नुकतीच पूर्ण केली. या स्पर्धेमुळे आत्मविश्‍वास वाढलेले अन्‌ सायक्‍लींग व फिटनेसची आवड असलेल्या पोलिस आयुक्त रविंद्र सिंघल यांनी आता 4300 किलोमीटरच्या रेस ऍक्रॉस अमेरिका (रॅम) या स्पर्धेत सहभागी होण्याचा ध्यास घेतला आहे.
नाशिकचे पोलिस आयुक्त सिंघल करणार अमेरिकेत 4300 किलोमीटर सायक्‍लींग

नाशिक : आव्हान देणारा अंगावर येणाऱ्या चढणीचा महाबळेश्‍वरचा घाट... धारवाडची अवघड चढाईची वळणे... गोव्यातील कठीण घाट.... यावर यशस्वी चढाई करीत पुणे- गोवा ही 433 किलोमीटरची सायकल स्पर्धा पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी अडतीस तासांत नुकतीच पूर्ण केली. या स्पर्धेमुळे आत्मविश्‍वास वाढलेले अन्‌ सायक्‍लींग व फिटनेसची आवड असलेल्या पोलिस आयुक्त रविंद्र सिंघल यांनी आता 4300 किलोमीटरच्या रेस ऍक्रॉस अमेरिका (रॅम) या स्पर्धेत सहभागी होण्याचा ध्यास घेतला आहे.

नुकत्याच झालेल्या या स्पर्धेत भाग घेत त्यांनी ती यशस्वीपणे पूर्ण केली. या स्पर्धेतून त्यांनी मानसिक व शारिरीक क्षमतेची परिक्षा घेणऱ्या अनेक प्रसंगांना सामोरे जात एक नवा अनुभव घेतला. सलग अडतीस तास सायकल चालविताना महाबळेश्‍वरचे कठीण व सरळ अंगावर येणाऱ्या चढणीच्या घाट पार करताना खुप दबाव आला. तर सातारा ते कोल्हापुर या सखल व सपाट रस्त्यावरचा आनंदही मिळाला. मात्र, धारवाडच्या न संपणाऱ्या सतत चढ उताराच्या घाटातून जाताना अंतर वाळवंटातील मृगजळासारखे कितीही कापले तरीही संपतच नव्हते. त्यात दोन वेळा त्यांना अडथळे आले. जखमी व्हावे लागले. डाव्या घुडग्याला दुखापत झाली.

अशीच परिक्षा घेणारा मार्ग गोव्यातही होता. मात्र जेव्हा स्पर्धा पुर्ण केली तेव्हा कन्या रवीजाने केलेल्या स्वागताने खुप आनंदीत झालो....सिंघल 'सरकारनामा'शी बोलताना सांगत होते.  पत्नी व भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी विनिता यांनी त्यांना या स्पर्धेत भाग घेण्यासाठी सतत प्रोत्साहन दिल्याचेही त्यांनी आवर्जुन सांगितले.

आयुक्त सिंघल ज्यावेळी सायकलिंग करत अंतर कापत होते त्यावेळी सौ. सिंघल सतत मार्गातील संपर्कात राहून माहिती घेत होत्या. छायाचित्रे काढून ती मित्र, मंडळींना व्हायरल करीत होत्या. या मार्गात सायकलपटू डॉ. राजेंद्र नेहेते, डॉ. कुणाल गुप्ते त्यांच्या समवेत होते. त्यांचीही मदत झाल्याचे रविंद्र सिंघल यांनी सांगितले. "या स्पर्धेमुळे आत्मविश्‍वास वाढला आहे. आता मला अमेरिकेतील 'रॅम' स्पर्धेत भाग घेण्याची इच्छा निर्माण झाली आहे. आता मी त्यावर लक्ष केंद्रीत करणार आहे." असे सिंघल यांनी सांगितले.

रवींद्र सींघल 1996 च्या आयपीएस बॅंचचे अधिकारी आहेत. त्यांची दिनचर्या पहाटे साडेचारला सुरु होते. सकाळी उठल्यावर ते ध्यानधारणा करतात. त्यानंतर सकाळी साडेसात पर्यंत व्यायाम, पोहणे व सायकल चालवणे यापैकी एक किंवा दोन व्यायाम करतात. त्याचा दैनंदीन कामात खुपच लाभ होतो असा त्यांचा अनुभव आहे. मानसिक समतोल, शारीरीक तंदुरुस्ती, कार्यक्षमता वाढते. दिवसभराचे नियोजन ते याचवेळेत निश्‍चित करतात. मन शांत राहते. ते नेहेमी समाधानी असतात. कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यास ते सक्षम व सदैव तयार असतात. अनेकदा ते तीन तीन दिवस न झोपता कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्याचा त्यांचा अनुभव आहे. विशेष म्हणजे ते कधीही दूरचित्रवाणी वरील कार्यक्रम पाहात नाहीत. स्मार्टफोन वरील सोशल मिडीयात ट्‌वीटर, व्हाटस्‌ऍप ते ठराविक वेळेतच हाताळतात. त्याचा त्यांना अपडेट राहण्यासाठी खुप उपयोग होतो.

ते म्हणाले, "दिवसात चोविसच तास असतात. त्याचे नियोजन कसे करायचे यावर यश व समाधानी जीवन अवलंबुन असतात. त्यामुळे शारीरीक तंदुरुस्तीला प्रत्येकाने प्राधान्य द्यावे. माझ्या सहकाऱ्यांना जमेल तेव्हा अथवा संवादाची संधी मिळेल त्या प्रत्येक ठिकाणी मी हेच सांगत असतो."

हे आहेत रवींद्र सिंघल...
पोलिस अधिकारी म्हणून राज्यात विविध ठिकाणी त्यांनी कामे केली आहेत. 2003 सिंहस्थ कुंभमेळ्यांतील कायदा व सुव्यवस्थेचे यशस्वी व्यवस्थापन केले आहे. त्यामुळे 2015 च्या सिंहस्थासाठीही त्यांना विशेष जबाबदारी दिली होती. गतवर्षी झालेल्या मराठा समाजाच्या आंदोलनानंतर नाशिकला झालेल्या आंदोलनासह अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या आहेत. शारिरीक तंदुरुस्तीवर त्यांनी नेहेमीच भर दिला आहे. राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत त्यांना पदक मिळाले आहे. मुंबई, ठाणे, नाशिकसह तेरा मॅरेथॉन स्पर्धांत त्यांनी भाग घेतला आहे. पोलिस स्पर्धांत विविध पदकेही मिळविली आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com