Nashik Onion Agitation Farmers Stalled Mumbai Highway | Sarkarnama

सोशल मिडीयाद्वारे कांदा शेतकऱ्यांनी केला मुंबई महामार्गावरच्या वाहतुकीचा वांदा! 

सरकारनामा ब्युरो 
शनिवार, 1 डिसेंबर 2018

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कांद्याे दर कोसळत आहेत. मात्र त्याबाबत सरकार काहीही उपाययोजना करीत नाही. कांदा दर वाढले तेव्हा सरकारने कांदा आयात केला. त्यामुळे दर कोसळले. आता तो कांदा मातीमोल भावाने विकला जात आहे. बाजार समित्यांत त्याची खरेदी थांबली आहे. त्याविरोधात कालपासून सोशल मिडीयावर युवा शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येत होते. त्या अनुषंगाने सकाळी मोठ्या संख्येने जमलेल्या परिसरातील शेतकऱ्यांनी मुंबई आग्रा महामार्गावर टेहरे फाटा येथे तासभर ठिय्या आंदोलन करीत वाहतुक रोखली.

नाशिक : 'कांद्याचे दर कोसळतात तेव्हा सरकार चीनचा कांदा खायला देते. पाकिस्तानातून कांदा आयात करते. स्वस्त मिळतो म्हणुन सरकारने पाहिजे तो कांदा खावा. मात्र, जगभर मागणी असलेला नाशिकचा कांदा का सरकार सडवते?' असा सवाल करत सरकारने आपले अस्थिर धोरण बदलावे यासाठी आज कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मुंबई- आग्रा महामार्गावरील वाहतुक तासभर रोखली. यापुढे सोशल मिडीयावरुनच हे आंदोलन केले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. 

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कांद्याे दर कोसळत आहेत. मात्र त्याबाबत सरकार काहीही उपाययोजना करीत नाही. कांदा दर वाढले तेव्हा सरकारने कांदा आयात केला. त्यामुळे दर कोसळले. आता तो कांदा मातीमोल भावाने विकला जात आहे. बाजार समित्यांत त्याची खरेदी थांबली आहे. त्याविरोधात कालपासून सोशल मिडीयावर युवा शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येत होते. त्या अनुषंगाने सकाळी मोठ्या संख्येने जमलेल्या परिसरातील शेतकऱ्यांनी मुंबई आग्रा महामार्गावर टेहरे फाटा येथे तासभर ठिय्या आंदोलन करीत वाहतुक रोखली. त्यामुळे मुंबईला जाणाऱ्या वाहतुकीचा वांदा झाला. यावेळी कसमादे कृती समिती स्थापन करण्यात आली. महेश पवार, जयेश अहिरे, आकाश भामरे, अभिषेक पगार, गणेश बच्छाव, वैभव हिरे यांसह शेकडो कार्यकर्ते जमले होते. 

काँग्रेस नेते डॉ. तुषार शेवाळे, शेतकरी संघटनेचे शेखर आबा पवार, के. एन. अहिरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे विनोद शेलार, जिल्हा बॅंकेचे माजी संचालक राजेंद्र भोसले, डॉ. जयंत पवार, संदिप पवार, भाजपचे अद्वय हिरे, अरुण पाटील आदींनी पाठींबा देत या आंदोलनात भाग घेतला. 

संबंधित लेख