Nashik News Women gives birth to Child in Rikshaw | Sarkarnama

नाशिकमध्ये हॉस्पीटलच्या दारात महिला प्रसूत; नेत्यांची धावपळ

संपत देवगिरे
मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017

महिला रुग्णालयाच्या प्रसववेदनेने तळमळत होती. नगरसेवकाचे घर शेजारीच होते.... ड्युटीवरील परिचारीका ड्युटी सोडून बाजारात फिरत होती. पहारेकरी पतंग उडवत होता.... अन्‌ ती असहाय्य महिला हाॅस्पीटलच्या दारातच प्रसुत झाली. ही कुठली दुर्गम आदिवासी पाड्याची नव्हे...नाशिक महानगरातली घटना आहे. आता सगळेच राजकीय पक्ष त्याविरोधात मैदानात उतरुन महापालिकेवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यात व्यग्र झाले आहेत.

नाशिक : महिला रुग्णालयाच्या प्रसववेदनेने तळमळत होती. नगरसेवकाचे घर शेजारीच होते.... ड्युटीवरील परिचारीका ड्युटी सोडून बाजारात फिरत होती. पहारेकरी पतंग उडवत होता.... अन्‌ ती असहाय्य महिला हाॅस्पीटलच्या दारातच प्रसुत झाली. ही कुठली दुर्गम आदिवासी पाड्याची नव्हे...नाशिक महानगरातली घटना आहे. आता सगळेच राजकीय पक्ष त्याविरोधात मैदानात उतरुन महापालिकेवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यात व्यग्र झाले आहेत.

नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात इन्क्‍युबेटर अभावी नवजात बालकं दगावण्याचा प्रकार ताजा असताना, महापालिकेच्या रुग्णालयात कर्मचारी उपस्थित नसल्यानं एका महिलेची प्रसूती चक्क रुग्णालयासमोरील रिक्षात करावी लागली...सुदैवानं बाळ आणि बाळंतीण सुखरूप असले तरी यामुळे शासकीय रुग्णालयांचा अनागोंदी कारभार पुन्हा चर्चेत आला आहे. यावेळी येथील महिला कर्मचाऱ्यांची माहिती घेतली असता त्यांनी रजिस्टरमध्ये 'आयुक्तांच्या घरी ड्युटी आहे. तिथे कामाला जात आहे.' अशी नोंद केली होती. परिचारिकेने दुरध्वनीवर माझ्या गाडीचे टायर पंक्‍चर झाले आहे. त्यामुळे उशीरा येईल अशी माहिती दिली. त्यामुळे रुग्णालयाच्या प्रशासनातील गोंधळ एकदम चर्चेत आला आहे.

आरोग्य यंत्रणांना शरमेनं मान खाली घालावी लागेल अशी ही घटना नाशिक मध्ये घडली आहे..एखाद्या दुर्गम आदिवासी पाड्यावर व्हावी अशी घटना मेट्रो सिटी समजल्या जाणाऱ्या नाशिक मध्ये घडली आहे..दिंडोरी रोड वरील मायको रुग्णालयात कर्मचारी उपलब्ध नसल्यानं श्रेया साकेत या महिलेची प्रसूती चक्क रुग्णालयाच्या आवारात एका रिक्षात झाली.

ही घटना घडल्याचे सोशल मिडीयात व्हायरल झाल्याने खळबळ उडाली. यावेळी भाजपाचे आरोग्य सभापती सतीश कुलकर्णी यांनी महापालिकेवर टीकेची सरबत्ती केली. जवळच राहणारे भाजपाचे नगरसेवक जगदीश पाटील यांनीही प्रशासनाला दोष दिला. काँग्रेस महिला आघाडीच्या शहराध्यक्षा, नगरसेवक वत्सला खैरे यांसह विविध कार्यकर्त्यांची रुग्णालयात रीघ लागली होती. यासंदर्भात कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.

पोटात कळा येऊ लागल्यान ही महिला रुग्णालयात गेली खरी, मात्र इथल्या नर्सने न तपासताच महिलेला परत पाठवलं. घरी गेल्यावर पुन्हा कळा येऊ लागल्यानं ती रुग्णालयात गेली. एकही डॉकटर, नर्स उपलब्ध नव्हती. त्यामुळे रुग्णालयाच्या दारात रिक्षातच परिसरातील दुकानदार, रिक्षाचालक देवदूत म्हणूनच आले व माझी प्रसुती केली.

भाजपच जबाबदार : डाॅ. हेमलता पाटील
नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपकरणांअभावी नवजात बालकांचा मृत्यू झाल्यानंतर या घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. आरोग्यमंत्र्यांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सगळ्यांनीच आश्वासनांच्या फैरी झाडल्या. मात्र भाजपची सत्ता असलेल्या महापालिकेत आरोग्य सेवेचा बट्ट्याबोळ झाला आहे.- डॉ. हेमलता पाटील, सभापती.

चौकशी करु : आयुक्त
हे प्रकरण अत्यंत खेदजनक आहे. त्याची सखोल चौकशी केली जाईल. यातीलोदषी कर्मचाऱ्यांवर गंभीर कारवाई करु. - अभिषेक कृष्णा, आयुक्त, नाशिक महानगरपालिका.

संबंधित लेख