Nashik news - suresh bhamare | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

डॉ. भामरेंचा पुढाकाराने सिंचनास 58 कोटी 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 28 ऑगस्ट 2017

नाशिक : नाशिकचे हरणबारी व तळवाडे कालव्यांचे काम रखडले आहे. बागलाणचा हा भाग केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरेंच्या धुळे मतदारसंघात आहे. या प्रकल्पांना चालना देण्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती. त्यामुळे या सिंचन प्रकल्पांना 58 कोटींचा निधी मिळणार आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांत उत्साह आहे. 

बागलाणा (जि. नाशिक) येथील काही शेतकऱ्यांनी नुकतीच धुळे येथे डॉ. भामरे यांची भेट घेतली होती. धुळे लोकसभा मतदारसंघात मालेगाव शहर आणि बागलाणा (सटाणा) या विधानसभा मतदारसंघांचा समावेष आहे. या भागातील सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर आहे. येथील विविध सिंचन प्रकल्प रेंगाळल्याने त्यासाठी पाठपुरावा सुरु होता. 

हरणबारी डावा कालवा, तळवाडे भामेर एक्‍सप्रेस कालवा या प्रश्‍नांवरुन गेले अनेक वर्षे राजकारण तापले होते. प्रश्‍नांचे गांभिर्य लक्षात घेऊन डॉ. भामरे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार तसेच वित्त सचिवांची भेट घेऊन पत्र दिले होते. पाटंबधारे विभागाला शंभर कोटींचा निधी अपेक्षीत होता. पहिल्या टप्प्यात त्यातील 58 कोटी रुपये मिळतील अशी माहिती डॉ. भामरे यांनी दिली. यामुळे तालुक्‍यातील विविध गावांचा सिंचनाचा प्रश्‍न मार्गी लागणार असल्याने भाजपचे कार्यकर्ते उत्साहात आहेत. 

संबंधित लेख