Nashik news - Shankarrao Dhondage slams BJP | Sarkarnama

शेतकऱ्यांची चेष्टा भाजपच्या मंत्र्यांना शोभत नाही : शंकरराव धोंडगे 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 1 ऑक्टोबर 2017

सरकारमधील मंत्री आणि पक्षाचे नेते तोंडाला येईल तसे बोलतात. त्याद्वारे शेतकऱ्यांची होणारी चेष्टा-मस्करी ही राजकर्त्यां भाजपच्या मंत्र्यांना शोभा देत नाही, असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या किसान सेलचे प्रदेश अध्यक्ष, माजी आमदार शंकरराव धोंडगे यांनी केले. 

नाशिक : सरकारमधील मंत्री आणि पक्षाचे नेते तोंडाला येईल तसे बोलतात. त्याद्वारे शेतकऱ्यांची होणारी चेष्टा-मस्करी ही राजकर्त्यां भाजपच्या मंत्र्यांना शोभा देत नाही, असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या किसान सेलचे प्रदेश अध्यक्ष, माजी आमदार शंकरराव धोंडगे यांनी केले. 

ते म्हणाले, की शेती नुकसानीत गेल्याने कर्जमाफीचे पॅकेज दिले गेले. पण कर्जमाफीकडे पाहण्याचा सरकारचा दृष्टीकोन पाहिला असता, शेतकऱ्यांचा छळवाद मांडला आहे, असे म्हणावे लागेल. आमची सगळी माहिती सरकारकडे असताना फॉर्म भरायला सांगितले. बरे एवढ्या न थांबता, चावडी वाचनाद्वारे बेइज्जत करण्याबरोबर गावात भांडणे लावण्याचा पद्धतशीर कार्यक्रम सरकारने राबवला आहे.

आमदार धोंडगे पुढे म्हणाले, सरकारमधील मंत्री आणि पक्षाचे नेते तोंडाला येईल तसे बोलतात. त्याद्वारे शेतकऱ्यांची होणारी चेष्टा-मस्करी ही राजकर्त्यांना शोभा देत नाही. खरे म्हणजे, शेतीमालाचे बाजारभाव ठरवण्याचा अधिकार असलेल्या आयोगांच्या शिफारशींना अर्थ नाही. आयोगांना नसलेला वैधानिक अधिकार हे त्यामागील मुख्य कारण आहे. तसेच आयोगाने भावाची शिफारस केल्यानंतर कुणी किती किंमतीत घ्यावे यालाही कायदेशीर आधार नाही. ही सारी परिस्थिती पाहिल्यानंतर मदत करण्याची जबाबदारी असलेल्या सरकारला जबाबदारीची जाणीव नाही. म्हणूनच मदत आणि संरक्षण सरकारकडून कितीपत मिळेल याबद्दलची संभ्रमावस्था शेतकऱ्यांमध्ये तयार झाली आहे. विधीमंडळामध्ये मंत्री अधिकची वीज असल्याचे सांगतात. पण 16 ते 18 तास भारनियमनाला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. अशावेळी शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी किसान मंचतर्फे प्रयत्न केला जात आहे. 

शेतकऱ्यांना दोन पिकांना भाव मिळायचा, दोन पिकांना भाव मिळायचा नाही. तरीही शेतकऱ्यांच्या संसाराचा गाडा चालायचा. पण गेल्या तीन वर्षांमध्ये दुष्काळ, नापिकीपाठोपाठ नोटबंदी अन्‌ शेतीमालाचे कोसळलेले भाव यामुळे शेतकरी आर्थिक विंवचनेत गुरफटला आहे. तीन वर्षांमध्ये सगळ्या पिकांना निम्मा भाव मिळाल्याने स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा शेतकरी हैराण झाले आहेत.

संबंधित लेख