Nashik News Ramdas Athavle about MNS | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

'मनसे'चे नगरसेवक श्रीमंत; पैशाने कसे फुटतील?

संपत देवगिरे
शनिवार, 21 ऑक्टोबर 2017

''मनसेचे सहाही नगरसेवक जबरदस्त पैसेवाले आहेत. त्यांना कोण पैसे देणार? ते पैसे घेऊन अजिबात फुटणारे नाहीत. राज ठाकरे यांनाच आपल्या नगरसेवकांना सांभाळता आले नाही. त्यामुळे त्यांचे हे नगरसेवक शिवसेनेत गेले ते योग्यच झाले.'' असे प्रतिपादन केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी "सरकारनामा'शी बोलताना केले.  

नाशिक : ''मनसेचे सहाही नगरसेवक जबरदस्त पैसेवाले आहेत. त्यांना कोण पैसे देणार? ते पैसे घेऊन अजिबात फुटणारे नाहीत. राज ठाकरे यांनाच आपल्या नगरसेवकांना सांभाळता आले नाही. त्यामुळे त्यांचे हे नगरसेवक शिवसेनेत गेले ते योग्यच झाले.'' असे प्रतिपादन केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी "सरकारनामा'शी बोलताना केले.  

आठवले म्हणाले, ''मनसेचे नगरसेवक गेले अनेक दिवस अस्वस्थ होते. त्यांची विकासकामे होत नव्हती. कोणत्या तरी राजकीय पक्षात जाण्याचा विचार त्यांच्या मनात घोळत होता. त्यांना पक्षात प्रवेश देऊन यासंदर्भात शिवसेनेने योग्यवेळी चांगला निर्णय घेतला आहे. त्यासाठी शिवसेनेला दोष देता येणार नाही. राज ठाकरे यांनाच आपल्या नगरसेवकांना सांभाळता आलेले नाही. त्यांनी आपल्या नगरसेवकांना विश्‍वासात घ्यायला पाहिजे होते.''

ते पुढे म्हणाले, ''पक्षांतर बंदी कायद्यातील तरतुदींनुसार दोन तृतीयांश सदस्य एकत्र येऊन पक्षातून बाहेर पडून स्वतंत्र गट करु शकतात. हा आपल्या देशात नियम असून त्यानुसार अनेक नेते पक्षांतर करीत असतात. तसेच सात पैकी सहा नगरसेवकांनी पक्षांतर केले तर त्यात चुकीचे काहीच नाही. सगळेच पक्ष अशा लोकांना घेतात. भाजपनेही अनेकांना आपल्या पक्षात घेतले आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे आता सत्ताधारी भाजपचा घटक पक्ष झाले आहेत. भाजपने त्यांचा स्विकार केलाच ना? मग शिवसेनेच्या उध्दव ठाकरेंना कसा दोष देता येईल?''

संबंधित लेख