पावसाने केले हिरेंच्या पुतळ्याचे अनावरण

निसर्गापुढे मानवी संकेत अन्‌ सरकारी नियम- कायदे नेहमीच थिटे पडतात, याची प्रचिती आज नाशिकमध्येही आली. जिल्हा बॅंकेच्या प्रवेशद्वारावर बसविलेला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते (कै) भाऊसाहेब हिरे यांचा पुतळा शासनाची परवानगी प्रलंबीत असल्याने आठ वर्षे कापडात गुंडाळलेल्या अवस्थेत होता. आज झालेल्या पाऊस आणि वादळी वाऱ्याने हे कापडच उडून गेल्याने आठ वर्षे रखडलेले अनावरण अचानक घडले.
पावसाने केले हिरेंच्या पुतळ्याचे अनावरण

नाशिक : निसर्गापुढे मानवी संकेत अन्‌ सरकारी नियम- कायदे नेहमीच थिटे पडतात, याची प्रचिती आज नाशिकमध्येही आली. जिल्हा बॅंकेच्या प्रवेशद्वारावर बसविलेला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते (कै) भाऊसाहेब हिरे यांचा पुतळा शासनाची परवानगी प्रलंबीत असल्याने आठ वर्षे कापडात गुंडाळलेल्या अवस्थेत होता. आज झालेल्या पाऊस आणि वादळी वाऱ्याने हे कापडच उडून गेल्याने आठ वर्षे रखडलेले अनावरण अचानक घडले.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कुळ कायद्याचे इनाम देऊन कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांनी जमीनदार केले होते. स्वातंत्र्य लढा, संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि ग्रामीण शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर आक्रमक राजकारण त्यांनी केले होते. राज्याच्या पहिल्या मंत्रीमंडळातही ते महत्वाचे मंत्री राहिले आहेत. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेसह अनेक सहकारी संस्थांचे ते संस्थापक होते. हिरेंच्या चौथ्या पिढीतील अद्वय हिरे बॅंकेचे अध्यक्ष असताना 2009 मध्ये बॅंकेच्या प्रवेशद्वारावर त्यांचा पुतळा बसविला. त्यासाठी आवश्‍यक परवानगी घ्यायचे मात्र राहून गेले. शासनाच्या दुरुस्त नियमावलीनुसार पुतळ्यांसाठी सोळा प्रकारच्या परवानग्या आवश्‍यक असतात. गेली आठ वर्षे त्या रखडल्या आहे. सध्या ती फाईल दीड वर्षापासून सहकार विभागाकडे प्रलंबीत आहे. त्यामुळे पुतळा कापडात गुंडाळून ठेवला होता. आज मात्र पावसाने ते कापड उडाले व कर्मवीर भाऊसाहेब हिरेंच्या पुतळ्यालाही परिसराचे दर्शन घडले. त्यामुळे विविध राजकीय नेते, कार्यकर्त्यांच्या ग्रुपवर दिवसभर पुतळ्याचा फोटो व पोस्ट व्हायरल झाल्याने तो चर्चेचा विषय बनला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com