Nashik NCP Started Preparing for Loksabha Elections | Sarkarnama

भारती पवारांच्या नियुक्तीतुन 'राष्ट्रवादी'ची लोकसभा तयारी सुरु 

सरकारनामा ब्युरो 
गुरुवार, 20 सप्टेंबर 2018

पक्षाने नव्या नियुक्‍त्या जाहीर केल्या आहेत. यामध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी कोंडाजी मामा आव्हाड, दिंडोरी लोकसभा मतदार संघासाठी अॅड. रविंद्र पगार यांची अध्यक्षपदी नियुक्ती केली. नवीन रचनेत जिल्हा कार्यक्षेत्र असतांना 15 तालुक्‍यांचे जिल्हाध्यक्ष असलेले अॅड. पगार यांच्याकडील नाशिक लोकसभा मतदार संघाचा पदभार कमी केला आहे.

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा मतदार संघनिहाय जिल्हाध्यक्ष निवडले आहेत. नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदार संघासाठी स्वतंत्र नियुक्ती झाली. कार्याध्यक्षपदी डॉ. भारती पवार यांची नियुक्ती झाली. त्यामुळे पक्षाने लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केल्याचा संदेश दिला आहे. जिल्हा परिषद सदस्या डॉ. भारती पवार दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या संभाव्य उमेदवार आहेत. आक्रमक आणि अभ्यासू लोकप्रतिनिधी म्हणुन त्यांचा उल्लेख केला जातो. 

पक्षाने नव्या नियुक्‍त्या जाहीर केल्या आहेत. यामध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी कोंडाजी मामा आव्हाड, दिंडोरी लोकसभा मतदार संघासाठी अॅड. रविंद्र पगार यांची अध्यक्षपदी नियुक्ती केली. नवीन रचनेत जिल्हा कार्यक्षेत्र असतांना 15 तालुक्‍यांचे जिल्हाध्यक्ष असलेले अॅड. पगार यांच्याकडील नाशिक लोकसभा मतदार संघाचा पदभार कमी केला आहे. त्यामुळे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ तुरुंगात असतांना राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मोर्चे, आंदोलन करणाऱ्या अॅड. पगार यांचे आगामी निवडणुकीच्या तोंडावर मात्र पंख छाटले आहेत. जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छूक असलेल्या विष्णुपंत म्हैसधुणे यांना कार्याध्यक्षपदी नियुक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री जयंत पाटील यांनी कार्यकारीणी तसेच पदाधिकारी निवड जाहीर केली. 

संबंधित लेख