Nashik Nandini River Cleaning | Sarkarnama

काँग्रेसच्या डॉ. हेमलता पाटील यांनी केली नंदिनी नदीची स्वच्छता 

संपत देवगिरे 
सोमवार, 26 फेब्रुवारी 2018

महापालिका सभापती तसेच काँग्रेसच्या प्रवक्‍त्या डॉ. हेमलता पाटील यांनी शहरातील नंदिनी नदीपात्राच्या स्वच्छतेबाबात समाजात जागरुकता वाढावी यासाठी लोकसहभागातुन नदीपात्राच्या स्वच्छतेस प्रारंभ केला. काल सकाळी त्या स्वतः नदीपात्रात उतरल्या व त्यांनी सफाईला प्रारंभ केला.

नाशिक : महापालिका सभापती तसेच काँग्रेसच्या प्रवक्‍त्या डॉ. हेमलता पाटील यांनी शहरातील नंदिनी नदीपात्राच्या स्वच्छतेबाबात समाजात जागरुकता वाढावी यासाठी लोकसहभागातुन नदीपात्राच्या स्वच्छतेस प्रारंभ केला. काल सकाळी त्या स्वतः नदीपात्रात उतरल्या व त्यांनी सफाईला प्रारंभ केला.

लोकसहभागातून नंदिनी नदीपात्राची स्वच्छता झाली. प्रभाग सभापती डॉ हेमलता पाटील यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविला गेला. भोसला मिलीटरी महाविद्यालय, एसएमआरके महाविद्यालय, धनवंतरी होमिओपॅथि, जि. डी. सावंत, जे. डि. बिटको, मराठा हायस्कूल, सरस्वती हायस्कूल, मॉडर्न हायस्कूल, ग्लोबल व्हिजन हायस्कूल आदी संस्थांचे विद्यार्थी, प्राचार्य, शिक्षक सफाई मोहिमेत सहभागी झाले. त्याच प्रमाणे नमामी गोदा संस्थें चे राजेश पंडित, हिंगमिरे,निसर्ग मित्र संस्थेचे सुनिल मेतकर, अण्णा पाटील, दर्शन पाटील, रोहन देशपांडे, कल्पेश केदार, अक्षय झेंडे, सुनिल आव्हाड, उद्धव पवार, गोपाळ जगताप,सचिन दिक्षीत, अनिल बहोत, भाग्यश्री भोईर, ज्योती पाटील, शोभा झेडे,मंदा खाडम, कांचन केदारे,विकी दहिंजे, बाजीराव तिडके, महापालिकेचे आरोग्य अधिकारी बूकाणे, घूगे, वंजारी, माडिवाले, स्वच्छता निरीक्षक पाटील, जसबिर सिंग, निलीमा साठे व परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. महापालिका स्वच्छता दूत चिन्मय उदगिरकर, पोलिस आयुक्त रविंद्र सिंघल यांनी उपस्थित राहून उपक्रमाचे कौतूक केले. सर्वांनी मिळून मिलिंदनगर येथील पुलाच्या येथील साफसफाई केली. 

जानेवारीमध्ये नंदिनी (नासर्डी) नदी प्रदुषणाबाबत नगरसेविका डॉ. पाटील यांनी उपोषण केले होते. त्यानंतर महापालिकेने युद्ध पातळी नदीच्या सफाईचे काम हाती घेतले. त्यात नदीपात्रातील गाळ, कचरा काढणे आणि नदीपात्रात मलजल बंद करणे याचा समावेश आहे. नंदिनी कायम स्वरूपी स्वच्छ रहावी म्हणून महापालिका अनेक उपाय योजना करीत आहे, मात्र लोकसहभागा शिवाय हे शिवधनुष्य पेलणे अवघड आहे. त्याच भावनेतुन रविवारी सकाळी लोकसहभागा मधून श्रमदान करण्यात आले. त्यात विविध संस्थांचे एसएमआरके महाविद्यालयाचे विद्यार्थी तसेच नागरिक सहभागी झाले. 

संबंधित लेख