कारवाईच्या धास्तीने अधिकाऱ्यांना घेतलाय तुकाराम मुंढेंचा धसका 

गोदावरी पुररेषेतील लॉन्सवरील अतिक्रमण कारवाईत न्यायालयाचा अवमान झाल्याचे प्रकरण आयुक्त तुकाराम मुंढे यांनी चांगलेच मनावर घेतले आहे. स्थगिती आदेश कुठे, कोणी रखडवला याच्या शोधासाठी त्यांनी शनिवारी रमजान ईदच्या सुटीच्या दिवशी नगररचना विभागाची चांगलीच हजेरी घेतली. त्यामुळे काही अधिकाऱ्यांनी त्याचा चांगलाच धसका घेतला आहे.
कारवाईच्या धास्तीने अधिकाऱ्यांना घेतलाय तुकाराम मुंढेंचा धसका 

नाशिक : गोदावरी पुररेषेतील लॉन्सवरील अतिक्रमण कारवाईत न्यायालयाचा अवमान झाल्याचे प्रकरण आयुक्त तुकाराम मुंढे यांनी चांगलेच मनावर घेतले आहे. स्थगिती आदेश कुठे, कोणी रखडवला याच्या शोधासाठी त्यांनी शनिवारी रमजान ईदच्या सुटीच्या दिवशी नगररचना विभागाची चांगलीच हजेरी घेतली. त्यामुळे काही अधिकाऱ्यांनी त्याचा चांगलाच धसका घेतला आहे. 

गोदावरी नदीच्या पूररेषेतील स्प्रिंगफील्ड लॉन्सचा काही भाग अतिक्रमण निर्मूलन विभागाने पाडला होता. त्यासाठी मालक व माजी महापौर प्रकाश मते यांनी मुंबई उच्च न्यायालयाकडून स्थगिती मिळवली होती. स्थगिती आदेशानंतरही कारवाई झाल्याने न्यायालयात आयुक्तांना माफी मागावी लागली होती. हे बांधकाम बांधुन देण्याचा आदेश न्यायालयाने दिला. त्यावर सुमारे वीस लाखांचा खर्च होणार आहे. त्याच्या भितीने येथील सहाय्यक अभियंता रवींद्र पाटील यापूर्वीच आत्महत्येची चिठ्ठी लिहून बेपत्ता झाले होते. पोलिसांनी त्यांचा शोध घेतल्यावर आता त्यांनी महिनाभर रजा घेतली आहे. हे सबंध प्रकरण आयुक्त मुंढे यांनी गांभीर्याने घेतले आहे. 

यासंदर्भात 21 मे रोजी आलेला स्थगिती आदेश योग्य यंत्रणेपर्यंत पोहोचविण्यात दोषी कोण? याच्या मुळाशी जाण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. स्थगिती आदेश कुठे रेंगाळला? या तपासासाठी आयुक्त मुंढे यांनी शनिवारी रमजान ईदची सुटी असतांना थेट नगररचना विभागात जाऊन झाडाझडती घेतली. स्थगिती आदेशाबाबत त्यांनी काही अधिकाऱ्यांची चांगलीच हजेरी घेतली. यासंदर्भात जबाबदारी निश्‍चित करण्याची प्रक्रीया सुरु झाली आहे. त्यामुळे या विभागातील काही अभियंत्यांनी कारवाईच्या भितीने चांगलाच धसका घेतला आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com