नाशिक विधान परिषद निवडणुकीत 100 टक्के मतदान, लक्ष्मीदर्शनाचा बोलबाला

 नाशिक विधान परिषद निवडणुकीत 100 टक्के मतदान, लक्ष्मीदर्शनाचा बोलबाला

नाशिक : नाशिक विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शंभर टक्के मतदान झाले. बहुतांश मतदार शेवटच्या अर्ध्या तासात मतदानाला गेले. मतदानाच्या पूर्वसंध्येला रात्रीच्या अंधारातही लक्ष्मीदर्शनाचा झगमगाट झाल्याची चर्चा होती. यामध्ये काही मतदारांनी स्वपक्षाबरोबरच प्रतिस्पर्धी उमेदवाराचाही दुस्वास न करता सगळ्यांचे स्वागत केले. मतदान केंद्रावर दिवसभर उत्साहात चुरस होती. प्रथमच जिल्ह्यातील सर्व केंद्राचे जिल्हाधिकारी कार्यालयात लाईव्ह प्रक्षेपणाची सोय केली होती. मतदानकेंद्राबाहेर महागड्या गाड्यांच्या वाहनांचा गराडा होता. राष्ट्रवादी कॉग्रेस,कॉग्रेस,मनसे-जनता व भाजपचा पाठिंबा असलेले उमेदवार ऍड शिवाजी सहाणे हे दिवसभर सर्वाधिक मतदार नाशिकला जिल्हाधिकारी कार्यालयातील केंद्रावर थांबून होते. 

शिवसेनेतर्फे फक्त दत्ता गायकवाड व दुपारनंतर शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे उपस्थित होते. राष्ट्रवादी कॉग्रेस-कॉग्रेस आघाडीतर्फे माजी मंत्री राजेश टोपे, आमदार अपूर्व हिरे, जयंत जाधव, रविंद्र पगार, मनसेचे ऍड राहुल ढिकले आदीसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. सकाळी आठपासून मतदारांच्या स्वागत करीत होते. बरोबर पावणे बाराला भाजपची पहिली बस आली त्यापाठोपाठ महिला नगरसेवकांची बस आली. भाजपचे शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप हे बसमधून उमेदवार घेउन 
आले. 

केंद्रनिहाय झालेले मतदान असे, नाशिक - 160, दिंडोरी - 26, पेठ - 22, इगतपुरी - 27, त्र्यंबकेश्वर - 24, निफाड - 29, सिन्नर - 39, येवला - 34, मालेगाव - 97, नांदगाव - 60, चांदवड - 24, कळवण - 24, देवळा - 23, बागलाण - 32, सुरगाणा - 23 एकुण- 320 पुरुष आणि 324 महिला अशा 644 मतदारांनी मतदान केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com