अंगणवाडी सेविकेचे उध्वस्त घरटे उभारून देत साजरी झाली राजाभाऊ वाजेंची दिवाळी 

शिवसेनेचे राजाभाऊ वाजे आमदार आणि नेते या ग्लॅमरमध्ये न रमणारे अन्‌ सदैव मदतीला धावून जाणारे कार्यकर्ते यातच समाधानी असतात. नाशिक- पुणे महामार्गावरचा अपघात असो वा अडचणीत सापडेलेले नागरीक रुग्णवाहिकेच्या आधी आमदार राजाभाऊ वाजे त्यांच्यापर्यंत पोहोचतात.
अंगणवाडी सेविकेचे उध्वस्त घरटे उभारून देत साजरी झाली राजाभाऊ वाजेंची दिवाळी 

नाशिक : घरापुढे पणती पेटवून दुष्काळात कोरड्या पडलेल्या मनात अन्‌ आयुष्यात प्रकाश पेरण्याच्या उत्सवाचा आजचा दिवस. मात्र या दिवशीच शॉर्ट सर्कीटने मीनाताई पगारेंचे घरटे आगीत भस्मसात झाले. पाणी प्यायला एक भांडेही शिल्लक राहिल नाही. या संकटात सरकारी पंचनामे, सोपस्कार अन्‌ कोरडी सहानुभूती बाजुला ठेऊन येथील आमदार राजाभाऊ वाजे मीनाताईंच्या मदतीला धाऊन गेले. स्वखर्चाने तिचे घरट उभे करण्यासाठी पदरमोड करीत त्यांनी आपद्‌ग्रस्ताचे अश्रू पुसले. 

शिवसेनेचे राजाभाऊ वाजे आमदार आणि नेते या ग्लॅमरमध्ये न रमणारे अन्‌ सदैव मदतीला धावून जाणारे कार्यकर्ते यातच समाधानी असतात. नाशिक- पुणे महामार्गावरचा अपघात असो वा अडचणीत सापडेलेले नागरीक रुग्णवाहिकेच्या आधी आमदार राजाभाऊ वाजे त्यांच्यापर्यंत पोहोचतात. या लोकांमध्येच ते दिवाळी साजरे करतात. मंगळवारी पाथरे (सिन्नर) येथील अंगणवाडी सेविका मीनाताई पगारे यांच्या घरी दिवाळीच्या दिवशीच आग लागली. त्यात सबंध घर व त्यातील गृहोपयोगी साहित्य नष्ट झाले. घराच्या भिंती, छत सगळेच नष्ट झाले. त्यामुळे मीनाताईंच्या व त्यांच्या कुटुंबीयांना रात्रभर शेजाऱ्यांकडे आश्रय घ्यावा लागला. 

याची माहिती मिळताच आमदार राजाभाऊ वाजे यांनी तिकडे धाव घेतली. त्यांनी स्वखर्चाने मीनाताईंना धान्य, जीवनाश्‍यक वस्तू, भांडी तसेच अन्य साहित्य उपलब्ध करुन दिले. नागरिकांनी सरकारी मदतीचा विषय काढताच, "शासकीय पंचनाम्यात फार तर आठ हजार रुपये मदत मिळेल. त्याची दीर्घकाळ वाट पहावी लागेल. त्यामुळे हे सरकारी सोपास्कारकाय कामाचे. त्यापेक्षा स्वतः तोषिश सोसणे हाच खरा न्याय'', अशी प्रतिक्रीया त्यांनी व्यक्त केली. त्यांनी तलाठ्याला बोलावून घेऊन पंचनामा करण्याच्या सुचना दिल्या. वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनाही घटनास्थळी भेट देऊन अहवाल देण्याच्या सुचना केल्या. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com