Nashik MLA Nirmala Gavits Diwali | Sarkarnama

नंदुरबारला काँग्रेसचा झेंडा फडकावा हीच भाऊबीजेची ओवाळणी - आमदार निर्मला गावीत 

सरकारनामा ब्युरो 
शनिवार, 10 नोव्हेंबर 2018

नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे माजी राज्यमंत्री माणिकराव गावीत यांनी सलग नऊ वेळा काँग्रेस पक्षाचे खासदार राहिले आहेत. पंतप्रधान इंदिरा गांधी यांपासून अनेक नेत्यांचा या मतदारसंघावर विशेष लोभ होता. श्रीमती सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या प्रचाराला प्रारंभ केल्यावर 1999 मध्ये पहिली सभा नंदुरबारलाच घेतली होती. 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत मात्र विजयकुमार गावीत यांच्या कन्या डॉ. हिना गावीत यांनी भाजपमध्ये प्रवेश करुन हा मतदारसंघ जिंकला. 

नाशिक : नंदुरबार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भरत गावीत यांच्या परिश्रमातून येत्या निवडणुकीत नंदुरबारला पुन्हा काँग्रेसचा झेंडा फडाकावा. आदिवासींची इडा-पीडा जावी हीच खरी ओवाळणी असेल, अशी अपेक्षा आमदार निर्मलाताई गावीत यांनी येथे व्यक्त केली. नंदुरबार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भरत गावीत यांचे त्यांच्या ज्येष्ठ भगिनी आमदार निर्मलाताई गावीत यांनी दिवाळीत भाऊबीजेला औक्षण केले. यावेळी त्यांनी ही अपेक्षा व्यक्त केली. 

नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे माजी राज्यमंत्री माणिकराव गावीत यांनी सलग नऊ वेळा काँग्रेस पक्षाचे खासदार राहिले आहेत. पंतप्रधान इंदिरा गांधी यांपासून अनेक नेत्यांचा या मतदारसंघावर विशेष लोभ होता. श्रीमती सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या प्रचाराला प्रारंभ केल्यावर 1999 मध्ये पहिली सभा नंदुरबारलाच घेतली होती. 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत मात्र विजयकुमार गावीत यांच्या कन्या डॉ. हिना गावीत यांनी भाजपमध्ये प्रवेश करुन हा मतदारसंघ जिंकला. 

सध्या काँग्रेसचे सर्वच नेते मनापासून निवडणुक तयारीत आहेत. त्यांनी लोकांमध्ये जाऊन चाचपणी सुरु केली आहे. या पार्श्‍वभूमीवर भाऊबीजेला आपली बहिण व काँग्रेसच्या आमदार गावीत यांच्या भेटीला नाशिकला आलेल्या भरत गावीत व त्यांच्या कुटुंबीयांत कौटुंबिक चर्चा झाली, तशी अपरिहार्यपणे लोकसभा निवडणुकीचीही झाली. यावेळी आमदार गावीत यांनी यंदाच्या निवडणुकीत नंदुरबारला पुन्हा काँग्रेसचा झेंडा फढकावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. 

संबंधित लेख