Nashik MLA Devyani Farande | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

हेमामालिनी या मथुरा येथून निवडणूक लढविणार
नरेंद्र मोदी वाराणशीतून, अमित शहा हे गांधीनगरमधून, नितीन गडकरी नागपूरमधून आणि राजनाथसिंह हे लखनौमधून निवडणूक लढविणार

भाजप गटबाजीत आमदार फरांदे एकाकी

संपत देवगिरे
शनिवार, 27 मे 2017

नाशिक मध्य मतदारसंघात शंभर खाटांचे रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव आमदार देवयानी फरांदे यांनी दिला होता. राज्य शासनाने त्याला मंजुरीही दिली. मात्र, रुग्णालयाच्या उभारणीसाठी जागेचा प्रश्न निर्माण झाला. त्यासाठी त्यांनी वडाळा येथील आरक्षीत जागेचा प्रस्ताव महापालिकेकडे दिला होता. याबाबतचा प्रस्ताव महासभेसमोर आला होता. तो पक्षांतर्गत राजकारणातून स्थगित ठेवण्यात आला आहे.

नाशिक - भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांचा शहरातील शंभर खाटांच्या रुग्णालयाचा प्रस्ताव शुक्रवारी झालेल्या महासभेत भाजपच्या नगरसेवकांच्या सूचनेवरुन स्थगित ठेवण्यात आला. त्यातून शहर भाजपमधील गटबाजी उघड झाली आहे. विकासाचा अजेंडा घेऊन सत्तेत आलेला भाजप नेत्यांतील अंतर्गत राजकीय गटबाजीने ग्रासला असून त्यात आमदार फरांदे एकाकी पडल्या आहेत.

नाशिक मध्य मतदारसंघात शंभर खाटांचे रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव आमदार देवयानी फरांदे यांनी दिला होता. राज्य शासनाने त्याला मंजुरीही दिली. मात्र, रुग्णालयाच्या उभारणीसाठी जागेचा प्रश्न निर्माण झाला. त्यासाठी त्यांनी वडाळा येथील आरक्षीत जागेचा प्रस्ताव महापालिकेकडे दिला होता. याबाबतचा प्रस्ताव महासभेसमोर आला होता. त्याला माजी आमदार वसंत गिते यांच्या समर्थक, नगरसेविका अर्चना थोरात यांनी स्थगितीची सूचना केल्यावर भाजपच्याच महापौर रंजना भानसी यांनी तो स्थगित केला.

त्यामुळे विकासाचा एजेंडा घेऊन सत्तेत आलेल्या भाजपची सत्ता असलेल्या महापालिकेत सत्ताधारी भाजपकडूनच हे रुग्णालय पुन्हा एकदा अडवण्यात आले आहे.
आमदार फरांदे यांनी या रुग्याणालयासाठी पाठपुरावा करुन जिल्हाधिका-यांमार्फत शासकीय प्रस्ताव तयार केला. प्रारंभी विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयाच्या आवारात जागा निश्चित झाल्यावर अंतर्गत विरोधात त्या जागेला मंजुरी मिळाली नाही. वडाळा येथील जागेबाबतही खासदार निधीतून वीस खाटांचे रुग्णालय प्रस्तावित असल्याचे कारण देत तो नाकारण्यात आला.

तिसरा प्रस्ताव विद्यमान उपमहापौर यांच्या प्रभागातील जागेचा होता. तो काल स्थगित करण्यात आला. विशेष म्हणजे या सभेला श्री. गिते अनुपस्थित होते. त्यामुळे त्यालाही वेगळाच वास येऊ लागला आहे. आमदार देवयानी फरांदे माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या निकटवर्तीय मानल्या जातात. त्यांचे पती प्रा. सुहास फरांदे पक्षाचे प्रवक्ते तसेच विविध संघटनात्मक पदांवर कार्यरत आहेत. अशा स्थितीत शहरातील तिन्ही जागांवर पक्षाचे आमदार निवडून आल्यावर मंत्रीपदासाठी सुरु झालेल्या स्पर्धेत फरांदे आघाडीवर होत्या. त्यामुळे शहराध्यक्षांसह विविध नेत्यांशी त्यांचे राजकीय संबध दुरावले.

या स्पर्धेतच त्यांचे राजकीय विरोधक माजी आमदार वसंत गिते महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसेला राम राम ठोकून भाजपमध्ये दाखल झाले. पक्षाने त्यांना महापालिका निवडणुकीत प्रभारी केले. पक्षाला महापालिकेत बहुमत मिळाले. त्यामुळे सध्या गीते यांची चलती आहे. त्यांना शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांची फूस असल्याने फरांदे विरोधकांचे बळ वाढले. त्यात सध्या तरी आमदार फरांदे एकाकी असल्याचे चित्र आहे.
   

संबंधित लेख