Nashik MLA Balasaheb Sanap | Sarkarnama

राजीनामा द्यायचा तर विधानसभा अध्यक्षांकडे देईन : आमदार बाळासाहेब सानप

सरकारनामा ब्युरो 
शनिवार, 28 जुलै 2018

सकल मराठा क्रांती मोर्चातर्फे काल आमदारांच्या घरासमोर आंदोलनाची घोषणा केली होती. त्यानुसार आज सकाळी पंचवटीमध्ये कृष्णनगर भागात जमलेल्या कार्यकर्त्यांनी घोषणा देत त्यांच्या घरासमोर रस्त्यावरच ठिय्या मांडला. यावेळी महिला, युवक तसेच पदाधिकारी उपस्थित होते.

नाशिक मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आज छावा मराठा संघटनेतर्फे आज भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष, आमदार बाळासाहेब सानप यांच्या घरासमोर आंदोलन केले. आमदार सानप यांनी या कार्यकर्त्यांचे निवेदन स्विकारले. ''माझा आरक्षणाच्या मागणीला पाठींबा आहे. मला जर राजीनामा द्यावासा वाटला, तर मी विधानसभेच्या अध्यक्षांकडे देईन,'' असे आमदार सानप यांनी यावेळी सांगितले. 

सकल मराठा क्रांती मोर्चातर्फे काल आमदारांच्या घरासमोर आंदोलनाची घोषणा केली होती. त्यानुसार आज सकाळी पंचवटीमध्ये कृष्णनगर भागात जमलेल्या कार्यकर्त्यांनी घोषणा देत त्यांच्या घरासमोर रस्त्यावरच ठिय्या मांडला. यावेळी महिला, युवक तसेच पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आमदार सानप न्यायालय इमारतीच्या भूमीपुजनासाठी गेले होते. सानप यांच्या घराच्या परिसरात मोठ्या संख्येने पोलिस बंदोबस्त होता. काही वेळानंतर आमदार सानप आले. त्यांच्या समवेत महापौर रंजना भानसी, महापालिकेतील भाजपचे गटनेते संभाजी मोरुस्कर होते. 

मात्र आश्‍वासन देण्याची वेळ आल्यावर महापौर आणि गटनेत्यांनी काढता पाय घेतला. आमदार सानप यावेळी बोलताना म्हणाले, "मुख्यमंत्र्यांशी मी चर्चा केली आहे. काही तांत्रिक अडचणी आहेत. दोन- तीन दिवसांत या विषयावर निर्णय होईल. गेल्या काही वर्षात सरकारने भरपुर घोषणा केल्या आहेत. त्यासाठी गरज पडली तर काम करु. महापौरांच्या वार्डात महापालिकेची भरपुर जागा पडून आहे. तेथे झोपडपट्टी होण्यापेक्षा मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी जागा देऊ.''

#MarathaKrantiMorcha

सरकारनामा अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

संबंधित लेख