मुंढेंची करवाढ चालते, मग तुकाराम मुंढे का नाही?

शहराची आर्थिक गाडी रुळावर आणण्यासाठी तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी करवाढ केली. त्याविरोधात सत्ताधारी भाजपच्या महापौरांसह सर्वच पक्षांनी मुंढेंविरोधात अक्षरशःआकाश पाताळ एक केले. महासभेत करवाढ मागे घेण्याचा ठराव झाला. मुंढेंची बदली करुनच नगरसेवक थांबले. मात्र, विद्यमान आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्यासमवेतच्या पत्रकार परिषदेत काल अचानक यु टर्न घेत महापौर रंजना भानसी यांनी करवाढ कायम ठेवत धक्का दिला.
Ranjana Bhanasi - Tukaram Mundhe
Ranjana Bhanasi - Tukaram Mundhe

नाशिक : शहराची आर्थिक गाडी रुळावर आणण्यासाठी तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी करवाढ केली. त्याविरोधात सत्ताधारी भाजपच्या महापौरांसह सर्वच पक्षांनी  मुंढेंविरोधात अक्षरशःआकाश पाताळ एक केले. महासभेत करवाढ मागे घेण्याचा ठराव झाला.  मुंढेंची बदली करुनच नगरसेवक थांबले. मात्र,  विद्यमान आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्यासमवेतच्या पत्रकार परिषदेत काल अचानक यु टर्न  घेत महापौर रंजना भानसी यांनी करवाढ कायम ठेवत धक्का दिला. त्यामुळे मुंढेंची करवाढ चालते, तर तुकाराम मुंढे का चालत नाही? असा प्रश्‍न विचारला जात आहे.

महापालिकेने गेल्या वर्षी केलेली करयोग्य मुल्य दरवाढ संपुर्ण पणे रद्द करण्याचे आदेश महासभेने देवूनही विद्ममान आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी महासभेच्या आदेशाला केराची टोपली दाखवत माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केलेली दरवाढ कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शेतीवरील करवाढीला स्थगिती देताना 59 हजार मिळकतींवर लावण्यात आलेली तीन पट दंडाची आकारणी किंचित कमी करण्यात आली. तर इमारतीच्या सामासिक अंतरावर लावण्यात आलेला कर रद्द करण्यात आला आहे. नविन मिळकतींवर कर लागु करताना बिल्डअप ऐवजी कार्पेट एरियावर कर लागू करण्यात आल्याने वीस ते पंचवीस टक्के करक्षेत्र कमी होणार आहे. सरसकट करवाढ रद्द करण्यात महापौर रंचना भानसी यांच्यासमोर असमर्थता दर्शविण्यात आल्याने भाजपने करवाढ रद्दच्या दिलेल्या आश्‍वासनाचा फुगा यानिमित्ताने फुटला आहे.

करवाढ कायम असुन काही प्रमाणात दंड मागे घेतले आहेत. शेतीवरील कराला तत्पुरती स्थगिती देण्यात आली. हे सर्व करतांना कायद्याचा अडसर असल्याची बचावाची ढाल महापौर भानसी यांनी समोर केली आहे. त्यामुळे घरपट्टीत करवाढ केल्यावर तुकाराम मुंढे यांना प्रचंड विरोध करण्यात आला. करवाढ राहिल्यास नगरसेवकांना जनतेपुढे जाणे अवघड होईल असे सांगितले गेले; एव्हढेच नव्हे तर भाजपच्या काही  नेत्यांनी पालकमंत्र्यांपुढे आक्रमक होत करवाढ रद्द झाली नाही तर मतदार आपल्याला मते देणार नाहीत, असाही आक्रोश केला होता.

त्यानंतर मुंढे यांची बदली करुन आयुक्तपदी राधाकृण गमे यांची नियुक्ती झाली. तेव्हा करवाढ रद्द होईल सगळ्यांची अपेक्षा होती.  प्रत्यक्षात आज महापौरांनी करवाढीचे अप्रत्यक्ष समर्थन केले. त्यामुळे नागरिकांना करवाढीतून दिलासा तर मिळाला नाहीच. तुकाराम मुंढे यांची करवाढ चालते तर त्यांची शिस्त अन्‌ ते स्वतः का चालत नाहीत, असा प्रश्न मात्र या निमित्तानं निर्माण झाला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com