Nashik Maratha Agitation from Ninth August | Sarkarnama

नाशिकमध्ये 9 आॅगस्टपासून मराठा आरक्षण मिळेपर्यंत बेमुदत ठिय्या आंदोलन

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

मराठा आरक्षणासाठी 9 ऑगस्टला चक्का-जाम आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यस्तरीय समन्वयकांशी संवाद साधून त्यात सहभाग घेण्यात येईल. त्याचवेळी डोंगरे वसतिगृह मैदानावर 9 ऑगस्टपासून आरक्षण मिळेपर्यंत ठिय्या आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा येथे सकल मराठा समाजातर्फे देण्यात आला. 

नाशिक : मराठा आरक्षणासाठी 9 ऑगस्टला चक्का-जाम आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यस्तरीय समन्वयकांशी संवाद साधून त्यात सहभाग घेण्यात येईल. त्याचवेळी डोंगरे वसतिगृह मैदानावर 9 ऑगस्टपासून आरक्षण मिळेपर्यंत ठिय्या आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा येथे सकल मराठा समाजातर्फे देण्यात आला. 

उच्च न्यायालयात दाखल असलेल्या मराठा आरक्षणविषयक याचिकेत सहभागी याचिका जिल्हातर्फे दाखल करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले. सकल मराठा क्रांती मोर्चाच्या नाशिक समन्वयक समितीतर्फे ही माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. समितीचे अॅड. श्रीधर माने, चंद्रकांत बनकर, हंसराज वडघुले, सुनील बागूल आदी उपस्थित होते. यावेळी बिगर राजकीय समन्वय समिती जाहिर करण्यात आली. 

याशिवाय शहराची विभाग, तालुका, विधी, निधी संकलन, सोशल मीडिया आणि प्रसार माध्यम, शिस्त, नियोजन व प्रशासन समितीची स्थापना करण्यात येणार आहे. या समितीतर्फे मराठा समाजातील सर्व पक्षीय राजकीय, सामाजिक नेते, विविध संघटना आणि समाज बांधवांचा आंदोलनात सहभाग असेल, असे सांगण्यात आले. 

आत्महत्याग्रस्त शेतकरी मुलांचा आजपासून जागर 
राज्यातील आत्महत्या केलेल्या मराठा समाजातील शेतकऱ्यांची आधारतीर्थ आश्रमातील 55 मुले राज्यभरात जागर करणार आहेत. त्याची सुरवात आज (ता.6) सिद्धीविनायक मंदिरातून होईल, असे सांगून बनकर म्हणाले, ''नाशिकमधील ठिय्या आंदोलनासाठी गावनिहाय संपर्क करण्यात येत आहे. त्यातून गावनिहाय आंदोलनात सहभाग राहील. आंदोलनाची व्यापकता वाढवण्यासाठी इतर समाजाचा देखील सहभाग घेण्यात येणार आहे.'' 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख