Nashik Leaders Trying for Raj Thakray's Public Meeting | Sarkarnama

नाशिकला सभा घेण्यासाठी राज ठाकरेंना साकडे

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 15 एप्रिल 2019

लोकसभा निवडणुकीत उमेदवार न उतरविता पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या विरोधात प्रचाराची रान उठविणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना यंदाच्या निवडणुकीत मोठी मागणी आहे. त्यांच्या दुसऱ्या टप्प्यातील नियोजनात नाशिकला सभा व्हावी यासाठी मनसे व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी प्रयत्नशील आहेत. त्यासाठी पाठपुरावा सुरु आहे.

नाशिक : लोकसभा निवडणुकीत उमेदवार न उतरविता पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या विरोधात प्रचाराची रान उठविणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना यंदाच्या निवडणुकीत मोठी मागणी आहे. त्यांच्या दुसऱ्या टप्प्यातील नियोजनात नाशिकला सभा व्हावी यासाठी मनसे व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी प्रयत्नशील आहेत. त्यासाठी पाठपुरावा सुरु आहे.

दरम्यान नाशिकमध्ये देखील राज ठाकरे यांची सभा होणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यासह सभांच्या तारखा निश्‍चित झाल्या असताना राज यांच्या सभेची तारीख निश्‍चित होत झालेली नाही. त्यामुळे कार्यकर्ते संभ्रमात सापडले आहेत. नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी येत्या 29 एप्रिलला मतदान होणार आहे. त्यापुर्वी प्रचारसभांना जोर येणार नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या यापुर्वी दोन सभा झाल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवासी व शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी युतीच्या मेळाव्यातून कार्यकर्त्यांना संबोधित केले.

पुढील आठवड्यात 22 एप्रिलला मोदी यांची पिंपळगाव बसवंत येथे सभा घेण्याचे नियोजन आहे. त्याचबरोबर ठाकरे व फडवणवीस यांची 24 एप्रिलला गोल्फ क्‍लब मैदानावर सभा घेण्याचे नियोजन आहे. सर्व प्रमुख नेत्यांच्या तारखा निश्‍चित झालेल्या असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेबाबत मात्र संभ्रम निर्माण झाला आहे. ठाकरे यांच्यासाठी नाशिकचा बालेकिल्ला भक्कम करणे महत्वाचे आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत त्यांची प्रचार सभा होणारचं असे सांगितले जात असले तरी अद्याप तारीख निश्‍चित नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. सन 2012 च्या महापालिका निवडणुक ठाकरे यांनी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टिका केली होती. त्याचं मैदानावर ठाकरे सभा घेण्यास उत्सुक नसल्याचे बोलले जाते. त्याचमुळे राज यांच्या सभेसाठी तारीख निश्‍चित होत नसल्याचे बोलले जात आहे.

संबंधित लेख