Nashik Helicopter | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

मध्य प्रदेशात भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार लढत
हैदराबाद : एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी घेणार तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची भेट
राजस्थानमध्ये काॅंग्रेस 91 तर भाजप 70 जागांवर आघाडीवर
रिझर्व बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजिनामा
अहमदनगर निकाल - भाजप - 14, शिवसेना - 22, राष्ट्रवादी - 20, कॉंग्रेस - 5, बसप - 4, सपा - 1, अपक्ष - 2
मराठा आरक्षण विरोधी याचिका दाखल करणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांच्यावर मुंबई हायकोर्ट परिसरात हल्ला
ब्रम्हपुरी नगरपरिषद- नगराध्यक्ष पदासाठी निवडून आलेल्या काँग्रेसच्या उमेदवार सौ. रिताताई दीपक उराडे यांचा ८०२० मतांनी विजय
रिसोड नगरपरिषद - नगराध्यक्ष पदी जन विकास आघाडीच्या विजयमाला आसनकर विजयी
लोहा नगरपालिका निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत, 17 पैकी 13 जागी भाजप विजयी, नगराध्यक्ष पदासाठी भाजप उमेदवार विजयी, काँग्रेस चार जागी विजयी

आदिवासींच्या मोडाळ्याला 'प्रधानमंत्री'चे हेलिकॉप्टर?

विजय पगारे
शनिवार, 22 एप्रिल 2017

इगतपुरी तालुक्यातील अत्यंत दुर्गम भाग असणाऱ्या मोडाळे गावासह शिरसाठे जिल्हा परिषद गटात लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होते. या भागात केलेली विविध विकासकामे माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांनी करून जनतेला विकास दाखवला. ही संकल्पना हेरुन चित्रपट निर्मिती करण्यात येणार आहे. 'प्रधानमंत्री' हा विकास पाहायला हेलिकॉप्टरने येणार आहेत.

इगतपुरी - एका मागासलेल्या दुर्गम खेड्यातील विकासाचे काम ऐकून भारावलेले देशाचे 'प्रधानमंत्री' त्या गावाला हेलिकॉप्टरने भेट देणार आहेत. विकासपुरुष आमदाराच्या लोकाभिमुख कामकाजावर आधारित 'प्रधानमंत्री' चित्रपटाचे चित्रीकरण इगतपुरी तालुक्यातील दुर्गम भाग असणाऱ्या मोडाळे गावात करण्यात येणार आहे. आठवडाभर चालणाऱ्या चित्रीकरणप्रसंगी 'प्रधानमंत्री' हेलिकॉप्टरने येणार असल्याची चर्चा इगतपुरी तालुक्यात रंगली आहे.
 
माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांच्या सहकार्याने या चित्रपटाला मोडाळे गावात विविध विकासाचे चित्रीकरण करण्यास हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. नाशिक येथील दिग्दर्शक देविदास निगळ यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या प्रधानमंत्री चित्रपटाचे लेखन रामनाथ माळोदे यांनी केले आहे. नृत्य दिग्दर्शन प्रशांत जगदाळे यांनी तर पटकथा प्रवीण देवरे, संकलन किशोर देवरे यांनी केले आहे.एका आमदाराने झपाटून काम केल्याने मतदारसंघात झालेला विस्मयचकित करणारा विकास या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे.

इगतपुरी तालुक्यातील अत्यंत दुर्गम भाग असणाऱ्या मोडाळे गावासह शिरसाठे जिल्हा परिषद गटात लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होते. या भागात केलेली विविध विकासकामे माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांनी करून जनतेला विकास दाखवला. ही संकल्पना हेरुन चित्रपट निर्मिती करण्यात येणार आहे. 'प्रधानमंत्री' हा विकास पाहायला हेलिकॉप्टरने येणार आहेत. विकासपुरुष आमदाराच्या भूमिकेत माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके असणार आहेत. तर नाशिकच्याच कलाकारांच्या भूमिका चित्रपटात समाविष्ठ आहेत. हे काहीही असले तरी कायम दुर्लक्षित भाग असणाऱ्या मोडाळे गावात 'प्रधानमंत्री' येणार असल्याची चर्चा इगतपुरी तालुक्यात सर्वत्र रंगली आहे.

संबंधित लेख