nashik godse and chavan | Sarkarnama

बिबट्यांचे संकट टाळण्यासाठी खासदार चव्हाण, गोडसेंची धावाधाव !

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 12 नोव्हेंबर 2018

नाशिक : पाणी, भक्ष्याच्या शोधात बिबट्यांचा गावोगावी संचार वाढला आहे. तीन बिबट्यांचे कुटुंब थेट नाशिक शहरातच वास्तव्यास आले आहे. मखमलाबाद भागात नागरिकांना वारंवार हे बिबटे दिसू लागले आहेत. लोकांमध्ये वावरणाऱ्या बिबट्यांमुळे नाशिकला "अवनी'ची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण आणि खासदार हेमंत गोडसे यांनी वनविभागाचा धावा केला आहे. 

गेल्या वर्षभरापासून याबाबत नागरीक तक्रारी करीत आहेत. शुक्रवारी रात्री आठला शहरातील मखमलाबाद येथे मयुर सुभाष पिंगळे हा द्राक्षबागेत फवारणी करीत होता. यावेळी ट्रॅक्‍टर वळवतांना हेडलाईटच्या प्रकाशात त्याला तीन बिबटे दिसले. त्याची पाचावर धारण बसली. त्याने मोबाईलद्वारे संपर्क केल्यावर अन्य मंडळी मदतीला आली. हेच बिबटे गेले वर्षभर या भागातील द्राक्षबागा आणि वस्तीत वावरत आहेत. 

हे बिबटे थेट शहरातच वास्तव्याला आले आहेत. दोन आठवड्यापूर्वी तोफखाना फायरींग रेंजमधील रानगवा शहरातील पार्थर्डी भागात आला होता. त्याला पुन्हा फायरींग रेंजमध्ये पिटाळण्यात आले. रविवारी शहरालगत शिंदे गावात विहिरीत बिबट्या सापडला. अत्यंत वर्दळीत व थेट शहरातच बिबटे वास्तव्याला आले. ते नागरिकांच्या संपर्कात आल्यास नरभक्षक होण्याची भिती आहे. त्यातुन नाशिक शहरात अवनीची पुनरावृत्ती नको यासाठी हे नागरिक खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण यांच्याकडे गेले. दुसऱ्या दिवशी खासदार हेमंत गोडसे यांच्याशीही संपर्क साधण्यात आला. तेव्हापासून हे दोन्ही खासदार सातत्याने वनविभागाशी संपर्क साधुन बिबट्यांना पकडण्यासाठी पाठपुरावा करीत आहेत. 

संबंधित लेख