Nashik Gets importance in NCP | Sarkarnama

भुजबळांसह तेरा पदाधिकाऱ्यांमुळे नाशिकचे राष्ट्रवादीतले महत्त्व वाढले 

सरकारनामा ब्युरो 
शनिवार, 1 सप्टेंबर 2018

यंदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीत सर्वाधीक तेरा महत्वाचे पदाधिकारी नाशिकचे आहेत. महत्वाच्या खजिनदारपदी हेमंत टकले, कायम निमंत्रीत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आणि माजी खासदार देवीदास पिंगळे उपाध्यक्ष आहेत. त्यामुळे पक्षात नाशिकचे महत्त्व वाढले आहे. 

नाशिक : 'पुलोद'च्या स्थापनेवेळी शरद पवार यांना जिल्ह्यातील सर्वच्या सर्व आमदार निवडून देत पाठबळ देणारा अशी नाशिक जिल्ह्याची प्रतिमा आहे. यंदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीत सर्वाधीक तेरा महत्वाचे पदाधिकारी नाशिकचे आहेत. महत्वाच्या खजिनदारपदी हेमंत टकले, कायम निमंत्रीत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आणि माजी खासदार देवीदास पिंगळे उपाध्यक्ष आहेत. त्यामुळे पक्षात नाशिकचे महत्त्व वाढले आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारीणीत ज्येष्ठ नेते, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ कायम निमंत्रीत आहेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माजी खासदार देवीदास पिंगळे यांची नुकतीच उपाध्यक्षपदी नियुक्ती केली. याशिवाय भुजबळ यांचे विश्‍वासु सहकारी अशी प्रतिमा असलेले दिलीप खैरे आणि अर्जुन टिळे सरचिटणीस आहेत. माजी नगरसेवक नाना महाले (उपाध्यक्ष), विश्‍वास ठाकुर (सहखजिनदार), माजी आमदार दिलीप बनकर, माजी आमदार जयंत जाधव, जिल्हा परिषद सदस्या भारती पवार, संदीप गुळवे यांसह एकंदर तेरा पदाधिकारी आहेत. पक्षाच्या संघटन विस्तारात व कार्यक्रमांत या सगळ्यांची महत्वाची जबाबदारी आहे. 

संबंधित लेख