Nashik Farmers Protest Tax Hike | Sarkarnama

नाशिकच्या करवाढीविरोधात शेतक-यांचा बैलपोळ्याला शिमगा

सरकारनामा ब्युरो 
सोमवार, 10 सप्टेंबर 2018

नाशिक महापालिकेत समाविष्ट सत्तावीस गावात आजही मोठ्या प्रमाणावर शेती होते. शेतकरी त्यावर उपजीविका करतात. मात्र, बांधकाम व्यावसायिक व महापालिकेतील राजकीय नेत्यांच्या हितसंबंधातुन शेती रहिवासी झोनमध्ये वर्ग झाली. व्यावसायिक लोकांच्या हितासाठी झालेला हा बदल शेतकरी वर्गाच्या मुळावर उठला आहे.

नाशिक : नाशिक महापालिकेने मालमत्ता करात वाढ केली. त्यात सर्वाधिक कर शेतीवर लावला. त्याचे पडसाद काल झालेल्या पोळ्याच्या सणात  दिसले. राजकीय कार्यकर्ते व शेतकरी एकत्र येत त्यांनी करवाढीच्या विरोधात बैलांना फलक लावून पोळा साजरा केला.

नाशिक महापालिकेत समाविष्ट सत्तावीस गावात आजही मोठ्या प्रमाणावर शेती होते. शेतकरी त्यावर उपजीविका करतात. मात्र, बांधकाम व्यावसायिक व महापालिकेतील राजकीय नेत्यांच्या हितसंबंधातुन शेती रहिवासी झोनमध्ये वर्ग झाली. व्यावसायिक लोकांच्या हितासाठी झालेला हा बदल शेतकरी वर्गाच्या मुळावर उठला आहे. करवाढीने त्रस्त जनतेने शहरात आंदोलन केले. 

काल पोळ्याच्या सणात गावोगावी शेतकरी, राजकीय नेत्यांनीही त्यावर शिमगा केला. विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते मतभेद विसरून यावर एकमताने सहभागी झाल्याचे दिसले. पाथर्डी गावात तर प्रत्येक बोलायच्या सजावटीत फैलावर महापालिका, करवाढीविरोधात घोषणा लिहिल्या होत्या. त्यामुळे नाशिकच्या पोळ्याच्या सणांचा शिमगा झाला. शेतकरी कृती समितीचे पदाधिकारी त्यासाठी एकत्र आल्याचे समितीचे अध्यक्ष व स्थायी समितीचे माजी अध्यक्ष निवृत्ती अरिंगळे यांनी सांगितले.
 

संबंधित लेख