nashik farmer | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

16 दिवसानंतर मराठा आंदोलन मागे, गिरीष महाजनांची शिष्टाई फळाला

महापालिकेलगतच्या गावांत होणार कर्जमाफीचे ठराव

संपत देवगिरे
मंगळवार, 25 एप्रिल 2017

नाशिक : राज्यात शेतकरी कर्जमाफीसाठी विरोधी पक्षांतर्फे संघर्ष यात्रा काढली जात आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रदिनी होणा-या ग्रामसभांतून शेतकरी कर्जमाफीचे ठराव होणार आहेत. त्याला अधिक धार देण्यासाठी महापालिकेत समाविष्ट सत्तावीस गावांतही ठराव करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रयत्न करणार आहे. 

नाशिक : राज्यात शेतकरी कर्जमाफीसाठी विरोधी पक्षांतर्फे संघर्ष यात्रा काढली जात आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रदिनी होणा-या ग्रामसभांतून शेतकरी कर्जमाफीचे ठराव होणार आहेत. त्याला अधिक धार देण्यासाठी महापालिकेत समाविष्ट सत्तावीस गावांतही ठराव करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रयत्न करणार आहे. 

दुस-या टप्प्यातील संघर्ष यात्रा नाशिकला आल्यावर सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पुढचा टप्पा म्हणून महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या दिवशी 1 मेस होणा-या ग्रामसभांतून राज्यभरात कर्जमाफीचे ठराव करण्याचे आवाहन केले होते. त्याबाबत ग्रामीण भागात आणि विविध जिल्ह्यात त्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. नाशिकच्या ग्रामीण भागात दोन्ही कॉंग्रेसकडून त्यासाठी अद्याप भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र नाशिक महापालिकेत समाविष्ट सत्तावीस गावांत मात्र असे ठराव व्हावेत यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी प्रयत्न सुरु केले आहेत. महापालिकेत समाविष्ट असल्याने या गावांत ग्रामपंचाय नाही. मात्र अद्यापही गावगाडा व गावपण टिकवून असलेल्या या गावांत शेती आणि विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था कार्यरत आहेत. या सहकारी संस्था सध्या कर्जवसुली नसल्याने अडचणीत आहेत. त्यामुळे या संस्थांतून कर्जमाफीचे ठराव होणार आहेत. 

मखमलाबाद, विहितगाव, नांदूर मानूर, आडगाव, पाथर्डी, सातपूर, अंबड, पिंपळगाव खांब, वडनेर, पिंपळगाव, गंगापूर आदी मोठ्या गावांतील राजकारणाला अद्यापही ग्रामीण पोत कायम असल्याने कर्जमाफीच्या निमित्ताने पुन्हा एकदा दोन्ही कॉंग्रेसला जनतेच्या जवळ जाण्याची संधी उपलब्ध होणार आहे. 

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी याविषयी आवाहन केले असल्याने त्याला शेतक-यांचा चांगला प्रतिसाद मिळेल. सर्व गावांत कर्जमाफीचे ठराव होतील असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी सांगितले. 
 

संबंधित लेख