nashik farmer | Sarkarnama

संकटग्रस्त शेतकऱ्यांकडून आमदारांचा शोध

सरकारनामा ब्युरो
रविवार, 16 एप्रिल 2017

चांदवड : दुष्काळ पाचवीला पुजलेल्या चांदवड तालुक्‍यावर बॅंकेने मदतीसाठी हात वर केल्याने यंदा नवे संकट कोसळले आहे. त्यामुळे सततच्या शेतकरी आत्महत्येच्या चर्चेबाबत कार्यकर्ते उपायांच्या शोधात आहेत. त्यासाठी किमान आमदारांनी दौरा करावा अशी अपेक्षा आहे. मात्र विविध कामात व्यग्र असल्याने भाजपचे आमदार डॉ. राहुल आहेर मात्र सापडत नसल्याने संकटग्रस्तांना शोध आमदारांचा अशी स्थिती आहे. 

सरकारने नोटबंदी जाहीर केली आणि शेतकऱ्याचे दिवाळे निघण्यास सुरवात झाली. नोटबंदी नावाच्या सुलतानी संकटामुळे अर्थव्यवस्थेचा शेवटचा स्तर असलेला मायबाप शेतकरी पूर्णपणे होरपळला गेला. खूप काबाडकष्ट करायचे आणि काळ्या आईच्या पोटातून सोन पिकवावं असा शेतमाल पिकवावा. बाजारात जाऊन दोन पैसे पदरात पाडून कुटुंबाचा गाडा हाकावा. शेतात जीवाच रान करून पिकविलेल्या शेतमालाला कवडीमोल मोल भाव मिळत असल्याने बळीराजा मोठ्या अडचणीत सापडला आहे. याबाबत बहुतांश शेतकरी सरकारवर नाराज आहेत. 
बाजारात शेतमाल विकायला आणला की व्यापारी म्हणतात उत्पादन जास्त झाल्याने शेतमालाला भाव नाही. त्यामुळे शेतीची मशागत, बी-बियाणे, औषध फवारणी, मजुरी आदी खर्च देखील बऱ्याचवेळा भरून निघत नाही. उत्पादन खर्च देखील वसूल होत नसल्याने अन्नदाता म्हणून कधीकाळी ओळख असलेला शेतकरी आज कर्जाच्या जाळ्यात गुंतला आहे. शेतकऱ्यांमध्ये बॅंकिंग व्यवहाराबद्दल साक्षरता तशी फार अल्प प्रमाणातच. बॅंकेत पैसे टाकायचे आणि काढायचे एवढीच काय ती बॅंकेची माहिती. चेक, एनएफटी, आरटीजीएस हे तर त्याच्या स्वप्नातही नसलेल्या गोष्टी. त्यात नोटबंदीपासून शेतमालाचे पेमेंट चेकने अदा केले जाऊ लागले आणि खऱ्या अर्थाने शेतकरी अडचणीत सापडू लागला. राष्ट्रीय बॅंकेच्या चेकला सुद्धा पंधरा ते वीस दिवसांचा कालावधी जाऊ लागला इतर बॅंकेचे तर विचारूच नका. अशा परिस्थितीत बऱ्याच शेतकऱ्याकडे एटीएम सुविधा नाही. त्यामुळे बॅंकेत नंबर लावल्याशिवाय पर्यायच नाही. शेतकऱ्यांचे चेक कुठलाही व्यापारी घ्यायला तयार नाही आणि शेतकऱ्याला मात्र चेकनेच पेमेंट दिला जात आहे. अशाने स्वतः कमविलेल्या पैशासाठी भीक मागायची वेळ आल्याने शेतकरी रस्त्यावर आला. याबाबत भाजपविषयीची नाराजी वाढत असल्याने कार्यकर्ते मात्र त्रस्त झालेत. 

संबंधित लेख