Nashik EX MP Rajabhau Godse is no more | Sarkarnama

नाशिकचे माजी खासदार राजाभाऊ गोडसे यांचे निधन 

सरकारनामा
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

बाळासाहेब ठाकरेंचा 'राजा'  शिवसैनिक  हरपला

नाशिक : नाशिकचे माजी खासदार राजाभाऊ गोडसे यांचे  निधन झाले आहे . त्यांचे वय ५७ वर्षे होते .  त्यांच्या पश्चात पत्नी , एक मुलगा दोन मुली , सून , जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. ते १९९६ ते ९८ या काळात ते नाशिकचे खासदार होते. 

सामान्यांची कामे अडवणा-याला शिवसेनेच्या भाषेत धडा देणारा कार्यकर्ता असा त्यांचा दबदबा होता . त्यांच्या संघटन कौशल्यामुळे आणि आक्रमक स्वभावामुळे ते  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे लाडके होते .  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यांना ' राजा ' नावाने संबोधत असत . 

 बालपणापासून लाल मातीच्या आखाड्यात शरीर कमावलेले राजाभाऊ नावाजलेले पहिलवान  म्हणून पंचक्रोशीत लोकप्रिय होते.  युवा अवस्थेतच त्यांनी शिवसेनेचे काम सुरू केले. आक्रमक कार्यपद्धतीमुळे ते जिल्हाप्रमुख झाले. जिल्ह्यात त्यांनी पक्षाचा मोठा विस्तार केला. 1996 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते  नेते खासदार डाॅ वसंतराव पवार यांचा पराभव केला. त्यातुन शिवसेनेचा या मतदारसंघात पहिल्यांदा खासदार झाला. 

ते दीर्घकाळ संसरी गावचे सरपंच होते. गेले काही वर्षे ते  आजारी होते. त्यांच्यावर अपोलो रूग्णालयात उपचार सुरू होते. त्यात पायाला गॅगरीन झाल्याने शस्त्रक्रिया करावी लागली. आज सायंकाळी त्यांचे निधन झाले. उद्या (ता. 18) त्यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार होणार  आहेत.
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख