Nashik Ex Mayor Installs CCTV Cameras | Sarkarnama

मनसेच्या अशोक मुर्तडकांनी साई पदयात्रेचा निधी वाचवून परिसरात बसवले 'सीसीटीव्ही' कॅमेरे 

संपत देवगिरे 
गुरुवार, 3 जानेवारी 2019

हल्ली राज्यभर राजकीय नेते, पदाधिकारी प्रभागातील कार्यकर्ते नागरीकांच्या पदयात्रा काढुन शिर्डीला जातात. मात्र, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस आणि माजी महापौर अशोक मुर्तडक यांनी वेगळा आदर्श निर्माण केला आहे. त्यांनी साई पदयात्रेच्या निधीत बचत केली. या पैशांतून कायदा, सुव्यवस्था टिकविण्यासाठी प्रभागातील इमारतींवर 'सीसीटिव्ही' बसविण्यात येणार आहेत. 

नाशिक : हल्ली राज्यभर राजकीय नेते, पदाधिकारी प्रभागातील कार्यकर्ते नागरीकांच्या पदयात्रा काढुन शिर्डीला जातात. मात्र, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस आणि माजी महापौर अशोक मुर्तडक यांनी वेगळा आदर्श निर्माण केला आहे. त्यांनी साई पदयात्रेच्या निधीत बचत केली. या पैशांतून कायदा, सुव्यवस्था टिकविण्यासाठी प्रभागातील इमारतींवर 'सीसीटिव्ही' बसविण्यात येणार आहेत. 

मनसेचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी महापौर अशोक मुर्तडक यांच्या मंडळातर्फे दरवर्षी शिर्डीला जाणाऱ्या साई राज पालखीचे स्वागत केले जाते. या पालखीमागून त्यांच्या मंडळाचे कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरीक पदयात्रेने शिर्डीला जातात. यंदा ते मर्यादीत करण्यात आले. त्यातून बचत झालेल्या निधीतून प्रभागातील इमारतींवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय झाला. महिला सुरक्षेसाठी घेतलेल्या या निर्णयाचे नागरीकांनी स्वागत केले आहे. शरद घुगे, श्‍याम आखाडे, संतोष आव्हाड, मंगेश तरसे आदींनी त्यासाठी सहकार्य केले. 

मखमलाबाद नाका परिसरात गेले काही दिवस विविध रात्रीच्या चोऱ्या तशाच अन्य घटनांनी नागरीक त्रस्त आहेत. विशेषतः महिलांच्या याबाबत तक्रारी असल्याने पोलिसांनी गस्त वाढविली आहे. मात्र, त्याचा फारसा उपयोग होऊ शकलेला नाही. त्यावर पर्याय म्हणुन परिसरातील प्रत्येक इमारतींत दोन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात दोन इमारतींवर चार कॅमेरे बसविले जातील. येत्या दोन दिवसांत त्याची कार्यवाही होईल, अशी माहिती माजी महापौर अशोक मुर्तडक यांनी दिली. 

संबंधित लेख