Nashik Engineer May go Mental Health Test | Sarkarnama

तुकाराम मुंढेवर आरोप करीत बेपत्ता झालेल्या अभियंता पाटील यांची होणार मानसिक आरोग्य तपासणी?

सरकारनामा ब्युरो 
मंगळवार, 24 जुलै 2018

पाटील पोलिसांना पुणे शहरात आढळले होते. त्यांचा जबाब नोंदविल्यावर त्यांना घरी सोडण्यात आले. त्यानंतर अनेक राजकीय नेते, महापौरांसह नगरसेवकांनी त्यांना सहानुभुती दाखवली होती. मात्र, ते कामावर रुजु न होता महिन्याच्या रजेवर निघुन गेले होते. ते अद्यापही कामावर परतलेले नाहीत.

नाशिक : महापालिकेतील सहाय्यक अभियंता रवी पाटील दोन महिन्यांपूर्वी 'आत्महत्या कीरत आहे' अशी चिठ्ठी लिहून बेपत्ता झाले होते. प्रशासनाच्या तपासणीत त्यांच्या कपाटात त्यांचा संबंध नसलेल्या शंभराहून अधिक फाईल्स आढळल्या आहेत. कामाचा ताण असल्याचा आरोप करणाऱ्या पाटील यांच्याकडे संबंध नसलेल्या फाईल्स कशा आल्या? याचे उत्तर त्यांना द्यावे लागणार आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या चौकशीचे आदेश दिल्याने पाटील चांगलेच गोत्यात येण्याची शक्‍यता आहे. 

पाटील पोलिसांना पुणे शहरात आढळले होते. त्यांचा जबाब नोंदविल्यावर त्यांना घरी सोडण्यात आले. त्यानंतर अनेक राजकीय नेते, महापौरांसह नगरसेवकांनी त्यांना सहानुभुती दाखवली होती. मात्र, ते कामावर रुजु न होता महिन्याच्या रजेवर निघुन गेले होते. ते अद्यापही कामावर परतलेले नाहीत. प्रशासनाने मात्र त्यांची रजा मंजुर केलेली नाही. पाटील यांसह त्यांच्या कुटुंबीयांनी आयुक्त मुंढे यांच्यावर आरोप केले होते. या पार्श्‍वभूमीवर पाटील परतल्यास त्यांना रुजु करुन न घेता मानसोपचारतज्ञाकडे तपासणीसाठी पाठविले जाणार आहे. 

आयुक्त मुंढे यांच्या उपस्थितीत त्यांचे कपाट उघडले असता त्यांच्याकडे 122 हून अधिक फाईल्स आढळल्या. सर्व निर्णय विभागप्रमुख घेतील असा निर्णय 22 मार्च, 2018 प्रशासनाने घेतला होता. त्यामुळे या फाईल्स त्यांनी संबंधीतांकडे सुपूर्द करावयास हव्या होत्या. त्यांनी त्या स्वतःकडे का ठेवल्या याचा काय खुलासा मिळतो, याची सगळ्यांनात उत्सुकता आहे. 

सरकारनामा अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
 

संबंधित लेख