नाशिक राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांची नियुक्ती रखडली 

नाशिकच्या अध्यक्षांच्या नियुक्तीविषयी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी नुकतीच वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधला. तेव्हा विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर नियुक्‍त्या होतील असे संकेत देण्यात आले आहेत.
नाशिक राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांची नियुक्ती रखडली 

नाशिक : विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे पक्षाची संघटनात्मक यंत्रणा आणि बहुतांश पदाधिकारी त्यात व्यग्र आहेत. त्याचा परिणाम राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाशिक, पुणे सह बत्तीस जिल्ह्यांतील अध्यक्षांच्या नियुक्‍त्या रखडल्या आहेत. किमान महिनाभर तरी या नियुक्‍त्या होणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले. 

राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्रेपन्न जिल्हा व शहरांच्या अध्यक्षांच्या संघटनात्मक निवडणुकीची प्रक्रीया पार पडली आहे. नाशिकमध्ये शहराध्यक्ष पदासाठी रंजन ठाकरे यांचा एकमेव अर्ज आला होता. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी अविनाश आदीक यांनी त्यांची नियुक्ती जाहीर केली. जिल्हाध्यक्षपदासाठी मात्र सात अर्ज आले होते. त्यामुळे त्याबाबत एकमत न झाल्याने नियुक्तीचे सर्व अधिकारी पक्षाध्यक्ष शरद पवार यांना देण्यात आले होते. त्यानंतर चोविस अध्यक्षांच्या नियुक्‍त्या जाहीर झाल्या. नाशिकच्या अध्यक्षांच्या नियुक्तीविषयी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी नुकतीच वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधला. तेव्हा विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर नियुक्‍त्या होतील असे संकेत देण्यात आले आहेत. 

नाशिकच्या जिल्हाध्यक्ष नियुक्तीविषयी सर्व अधिकार शरद पवार यांना देण्यात आले आहेत. विधान परिषद निवडणुकीनंतर या नियुक्‍त्या होणार आहेत. याबाबत स्थानिक पातळीवर कोणतेही मतभेद राहिलेले नाहीत - माजी खासदार देविदास पिंगळे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com