Nashik District Dams | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा समाजाला स्वतंत्र कोट्यातूनच आरक्षण : मुख्यमंत्री
ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देणार - मुख्यमंत्री
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी स्वतंत्र प्रवर्ग तयार करणार - मुख्यमंत्र्यांची घोषणा

धरणांनी गाठला तळ-भविष्यात संघर्षाची शक्यता

संपत देवगिरे
सोमवार, 24 एप्रिल 2017

धरणांची वाटचाल तळ गाठण्याकडे सुरु असल्याने कालव्यांना पिण्याचे पाणी सोडतांना परिसरातून अनधिकृत उपसा होऊ नये यासाठी विशेष खबरदारी घ्यावी लागत आहे. पालखेड धरणातून पाणी सोडतांना पिंपळगाव बसवंत परिसरातील शंभर डोंगळे त्यासाठी पोलिस बंदोबस्तात काढण्यात आले. त्यावरुन राजकारण सुरु झाले असून स्थानिक आमदार अनिल कदम यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यामुळे प्रशासन पाण्याबाबत आत्तापासूनच सावध झाले आहे.

नाशिक - महाराष्ट्राचे चेरापुंजी, धरणांचा जिल्हा अन् अगदी मुंबईची तहान भागवणारे नाशिक अशा विविध बिरुदावलींनी गोंजारल्या जाणा-या नाशिक जिल्ह्यातील सहा प्रमुख धरणांनी तळ गाठला आहे. जिल्ह्यातील धरणांत 29 टक्के साठा शिल्लक आहे. त्यामुळे आगामी काळात कालव्यांतून पाणी सोडतांना संघर्षाची चिन्हे आहेत.

जिल्ह्यातील चोवीस मोठ्या प्रकल्पांपैकी गौतमी गोवरी, वाघाड, केळझर, पुणेगाव, नागासाक्या, माणिकपुंज ही सात धरणे अन् नांदूरमधमेश्वर प्रकल्पांनी तळ गाठला आहे. जिल्ह्यातींल धरणांची साठवण क्षमता 65,814 दशलक्ष घनफूट असून त्यात सध्या 19,202 दशलक्ष घनफूट असा 29 टक्के साठा आहे. जिल्ह्यात गोदावरी, गिरणा आणि पालखेड हे पाटबंधारे समुह असून यामध्ये अनुक्रमे 42, 21 आणि 68 टक्के साठा आहे.

गेल्या महिन्यात 23 मार्चला 36 टक्के साठा होता. मात्र बाष्पीभवन, सिंचनाची मागणी यामुळे सध्या 29 टक्के साठा आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे नियोजन करतांना आरक्षण असलेल्या गावे, पाणीपुरवठा योजनांसाठी 31 जुलै अखेर तीन महिन्यांचे नियोजन करण्यावर पाटबंधारे व जिल्हा प्रशासनाचा भर आहे. त्यादृष्टीने सध्या प्रशासन काळजी घेत आहे.

संबंधित लेख