Nashik CP Ravindra Singhal to Participate in IronMan Competition in France | Sarkarnama

नाशिकचे पोलिस आयुक्त होणार फ्रान्समध्ये आयर्नमॅन

संपत देवगिरे 
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल रविवारी (ता.26) होणाऱ्या आणि युरोप खंडात नावाजलेल्या 'आयर्नमॅन' स्पर्धेत सहभागी होणार आहेत. जगभरातील एक हजार अॅथलिट व खेळाडु त्यात सहभागी होणार आहेत.  या स्पर्धेत शारीरीक, मानसिक क्षमता अन्‌ चिकाटीचा कस लागतो.

नाशिक : पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल रविवारी (ता.26) होणाऱ्या आणि युरोप खंडात नावाजलेल्या 'आयर्नमॅन' स्पर्धेत सहभागी होणार आहेत. जगभरातील एक हजार अॅथलिट व खेळाडु त्यात सहभागी होणार आहेत.  या स्पर्धेत शारीरीक, मानसिक क्षमता अन्‌ चिकाटीचा कस लागतो. भारतातील मोजक्‍या स्पर्धकांत सिंघल यांचा समावेष असल्याने स्पर्धेत यशस्वी ठरल्यास ते 'आयर्नमॅन' हा किताब पटकावतील. 

ही स्पर्धा एकाच दिवसात व सोळा तासांत संपवावी लागते. त्यात 180 किलोमीटर सायक्‍लींग त्यानंतर लगेचच तीन किलोमीटर पोहणे आणि शेवटी बेचाळीस किलोमीटर धावावे लागते. यातील बहुतांशी इव्हेट जागतिक क्रीडा स्पर्धांशी तुलना करणाऱ्या असतात. त्यामुळे वयाच्या पन्नाशीला पोहोचलेल्या आयुक्त सिंघल यांनी त्यासाठी अतिशय खडतर परिश्रम व सराव केला आहे. यापूर्वीही त्यांनी यापूर्वी नोव्हेंबर, 2017 मध्ये 360 किलोमीटरची पुणे- गोवा सायकल स्पर्धेत भाग घेऊन ती पूर्ण केली होती. 

यातून आत्मविश्‍वास वाढल्यावर त्यांनी रेस अक्रॉस अमेरिका स्पर्धेत भाग घेण्याचा मानस व्यक्त केला. त्यात तांत्रिक अडचणी आल्या. आता ते तेव्हढ्याच खडतर स्पर्धेत सहभागी होत आहेत. त्यामुळे त्यांच्या पत्नी सचिव विनिता सिंघल, सायकलींग असोसिएशनचे पदाधिकारी आणि सहकाऱ्यांनी त्यांना प्रोत्साहन देत मनोबल वाढविले आहे. 
 

संबंधित लेख