Nashik CP felicitates Constables Engineer Son | Sarkarnama

हवालदाराच्या इंजिनिअर पुत्राच्या पाठीवर पोलिस आयुक्त सिंघल यांची शाबासकीची थाप

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 11 सप्टेंबर 2018

साधारण स्थितीत प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेतलेला आनंद पाळदे अभ्यासात हुशार होता. गुणवत्तेच्या बळावरच त्याला अभियांत्रीकीसाठी प्रवेश मिळाला. नुकतीच त्याची महाविद्यालयात कँम्पस मुलाखतीत परदेशातील नामांकित कंपनीमध्ये निवड झाली. यानिमित्ताने पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंघल यांनी आनंद पाळदे याचे कौतूक केले.

नाशिक : पोलीस आयुक्तालयातील विशेष शाखेत कार्यरत असलेले पोलीस हवालदार चंद्रकांत पाळदे यांचा मुलगा इलेक्‍ट्रिकल इंजिनिअरींगचा विद्यार्थी आहे. महाविद्यालयात झालेल्या  कँम्पस इंटरव्ह्यूमध्ये त्याच्या हुशारीला दाद मिळाली. आता त्याला दक्षिण अफ्रिकेतील बहुराष्ट्रीय कंपनीत नियुक्ती देण्यात आली आहे. पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी त्याला व्यक्तीशः बोलावून त्याचे कौतुक केले. त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली.  

साधारण स्थितीत प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेतलेला आनंद पाळदे अभ्यासात हुशार होता. गुणवत्तेच्या बळावरच त्याला अभियांत्रीकीसाठी प्रवेश मिळाला. नुकतीच त्याची महाविद्यालयात कँम्पस मुलाखतीत परदेशातील नामांकित कंपनीमध्ये निवड झाली. यानिमित्ताने पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंघल यांनी आनंद पाळदे याचे कौतूक केले. परदेशामध्ये सर्वोत्तम कामगिरी करीत देशाचे नाव उंचाविण्यासाठी शुभेच्छा दिल्या. शिक्षणाबरोबरच शारिरिक तंदुरुस्ती राखण्याचा सल्लाही दिला. आनंद हा गुरु गोविंदसिंग अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थी आहे. या कौतुक सोहोळ्याच्यावेळी मुख्यालयाच्या उपायुक्त माधुरी कांगणे, विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे, चंद्रकांत पाळदे, विशेष शाखेतील कर्मचारी उपस्थित होते. 

संबंधित लेख