हुश्‍श..अखेर नगरसेवकांना मिळाला ३९ लाखांचा विकास निधी

दोन टक्‍क्‍यांपेक्षा अधिक नगरसेवक निधी देता येत नाही, हे कारण देत गतवर्षी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नगरसेवक निधी बंद केला होता. त्यामुळे गेले वर्षभर आदळआपट करणाऱ्या नगरसेवकांना आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिलासा दिला आहे. त्यांनी नऊ लाख रुपये नगरसेवक निधी मंजुर केला. कायदेशीर अडचण निर्माण होवू नये म्हणून प्रभाग समित्यांसाठी प्रत्येकी तीस लाख रुपयांचा निधी मंजुर केला. त्यामुळे प्रत्येक नगरसेवकाला ३९ लाख रुपये विकास निधीची तरतुद अंदाजपत्रकात करण्यात आली आहे. त्यामुळे नगरसेवकांमध्ये 'अच्छे दिन' आल्याची भावना आहे.
हुश्‍श..अखेर नगरसेवकांना मिळाला ३९ लाखांचा विकास निधी

नाशिक : दोन टक्‍क्‍यांपेक्षा अधिक नगरसेवक निधी देता येत नाही, हे कारण देत गतवर्षी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नगरसेवक निधी बंद केला होता. त्यामुळे गेले वर्षभर आदळआपट करणाऱ्या नगरसेवकांना आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिलासा दिला आहे. त्यांनी नऊ लाख रुपये नगरसेवक निधी मंजुर केला. कायदेशीर अडचण निर्माण होवू नये म्हणून प्रभाग समित्यांसाठी प्रत्येकी तीस लाख रुपयांचा निधी मंजुर केला. त्यामुळे प्रत्येक नगरसेवकाला ३९ लाख रुपये विकास निधीची तरतुद अंदाजपत्रकात करण्यात आली आहे. त्यामुळे नगरसेवकांमध्ये 'अच्छे दिन' आल्याची भावना आहे.

महापालिका अधिनियमात नगरसेवकांना दोन टक्के व्यतिरिक्त निधी देण्याची तरतुद नाही. वाढत्या महागाईमुळे नगरसेवकांना प्राप्त होणारा दोन लाख रुपये निधी अपुरा पडतो. गतवर्षी तत्कालिन आयुक्त मुंढे यांनी अशा प्रकारचा निधीचं देता येत नसल्याचे स्पष्टीकरण देत नगरसेवक निधीवर फुली मारली होती. त्यामनुळे संतापलेल्या नगरसेवकांना शांत करण्यासाठी प्रभागातील चार नगरसेवकांना बारा लाखांचा निधी देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र नगरसेवकांनी त्याला नकार दिला होता. नगरसेवकांना एक कोटींचा निधी देण्याचा ठराव महासभत करण्यात आला होता. मात्र, आता आज सादर झालेल्या अंदाजपत्रकात आयुक्तांनी त्यातुन मार्ग काढला आहे. नगरसेवकांना ३९ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. तरतुदीनुसार 2 टक्के म्हणजेच नऊ लाख रुपये मिळतील. त्यासाठी ३८.१० कोटींची तरतुद करण्यात आली आहे.

१८९४ कोटींचे अंदाजपत्रक
महापालिकेचे अंदाजपत्रक स्थायी समितीच्या सभापती हिमगौरी आडके- आहेर यांना आयुक्तांनी सादर केले. त्यानुसार महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी १८९४.५०कोटींचे प्रारूप अंदाजपत्रक आज स्थायी समितीला सादर केले. विकासाचा समतोल साधताना सर्व विभागांना निधी देण्याचे आश्‍वाशीत केले आहे. नगरसेवकांना स्वनिधी व प्रभाग विकासाच्या माध्यमातून ३९ लाख रुपयांचा निधीची तरतुद केली. कोणतिही करवाढ व दरवाढ त्यात सुचविण्यात आलेली नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com