तुकाराम मुंढेंची पाठ फिरताच नगरसेवकांकडून जादा विषयांची खिरापत! 

आर्थिक शिस्त, प्रशासकीय नियमांचे कठोर पालनासाठी मावळते आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महासभेत ऐनवेळचे जादा विषय बंद केले होते. त्यामुळे राजकीय नेत्यांच्या खिरापतीला लगाम बसला होता. मात्र मुंढे यांची बदली झाली अन्‌ राधाकृष्ण गमे आले. गमे यांच्या कारकिर्दीतील पहिल्याच सभेत विषयपत्रिकेसोबत जादा विषयांची भली मोठी यादी आली. त्यामुळे मुंढेंची पाठ फिरताच राजकीय नेते, नगरसेवकांची खिरापत सुरु झाल्याची चर्चा सुरु झाली.
तुकाराम मुंढेंची पाठ फिरताच नगरसेवकांकडून जादा विषयांची खिरापत! 

नाशिक : आर्थिक शिस्त, प्रशासकीय नियमांचे कठोर पालनासाठी मावळते आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महासभेत ऐनवेळचे जादा विषय बंद केले होते. त्यामुळे राजकीय नेत्यांच्या खिरापतीला लगाम बसला होता. मात्र मुंढे यांची बदली झाली अन्‌ राधाकृष्ण गमे आले. गमे यांच्या कारकिर्दीतील पहिल्याच सभेत विषयपत्रिकेसोबत जादा विषयांची भली मोठी यादी आली. त्यामुळे मुंढेंची पाठ फिरताच राजकीय नेते, नगरसेवकांची खिरापत सुरु झाल्याची चर्चा सुरु झाली. 

तुकाराम मुंढे यांनी महापालिकेचे आयुक्त म्हणुन कार्यभार स्विकारल्यावर कामकाजाला शिस्त लावण्याचे काम हाती घेतले. त्याचा भाग म्हणुनच त्यांनी प्रशासनात अनेक महत्वाचे बदल केले होते. विशेषतः नगरसचिव विभागाने कोणतेही ऐनवेळचे जादा विषय स्विकारु नये असा दंडक घालण्यात आला होता. त्यामुळे राजकीय नेते, नगरसेवक नगरसचिव कार्यालयात फिरकण्यासही धजत नव्हते. आर्थिक शीस्त म्हणुन नव्या कामांवर प्राधान्यक्रम ठरविण्यात आला होता. मुंढे यांनी मोठी आर्थिक बचत केली होती. महापालिकेची आर्थिक गाडी रुळावर आली होती. 

मात्र यामध्ये राजकीय नेते, नगरसेवकांची गैरसोय झाली होती. या राजकीय नाराजीतुनच मुंढे यांची बदली झाली. मुंढे यांच्या जागेवर राधाकृष्ण गमे यांची आयुक्तपदी नियुक्त झाली होती. गमे यांच्या उपस्थितीतील पहिल्याच महासभेत जादा विषयांची भली मोठी यादी विषयपत्रिकेसोबत होती. त्यामुळे यावरुन नवा वाद झाला. मात्र त्यात सर्वच विरोधकांत फुट पडल्याचे चित्र पहाला मिळाले. त्यामुळे विरोधाचा देखावा की मिलीभगत याचीच चर्चा सुरु झाली. यावरुन प्रती महासभा झाली. त्यातही हेच चित्र राहिले. भाजप विरोधकांत गट-तट दिसले. 

शिवसेनेची निदर्शने 
काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस मधील फुटीमुळे प्रति महासभा देखील उधळली गेल्याने शिवसेनेच्या सदस्यांनी सभागृहातून काढता पाय घेत सभागृहाबाहेर निदर्शने केली. 'रामायण' निवासस्थानी महापौरांना भेटण्यासाठी नगरसेवक गेले. परंतू, तेथे महापौर नसल्याने शिवसेनेने निदर्शने केली. अनेक विषय प्रलंबित असल्याने चर्चा होणे गरजेचे होते. परंतू, महापौरांनी सभा गुंडाळल्याने त्याचा निषेध करण्यात आला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com