Nashik-commissioner-mundhe-verses-corporators | Sarkarnama

#NashikForMundhe : तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ शुक्रवारी `वॉक फॉर कमिश्‍नर'  

संपत देवगिरे
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

नगरसेवकांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात अविश्‍वास प्रस्तावाची घोषणा करताच सोशल मिडीयावर त्यांच्या समर्थनासाठी "नाशिकफॉरमुंढे' यांसारखे विविध हॅशटॅग सुरु झाले.

नाशिक : नगरसेवकांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात अविश्‍वास प्रस्तावाची घोषणा करताच सोशल मिडीयावर त्यांच्या समर्थनासाठी "नाशिकफॉरमुंढे' यांसारखे विविध हॅशटॅग सुरु झाले. समर्थनाचे व्हाटस्‌ऍपचे ग्रुप फुल्ल होत आहेत. शहरात `वॉक वीथ कमिश्‍नर' राबविणाऱ्या तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ शुक्रवारी "वॉक फॉर कमिश्‍नर' होणार आहे. सदैव चर्चेत राहणारे मुंढे पुन्हा चर्चेत आलेत. 

सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची एक विशिष्ट प्रतिमा निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांच्या विषयी सहानुभुती नाही. मात्र आयुक्त मुंढे यांचे करवाढ, गणेशोत्सवावरील बंधने, शहराची महसुल वाढाचे निर्णय नागरीकांना बुचकाळ्यात टाकणारे आहेत. त्याने काही नागरीकांत गोंधळ होता. मात्र आयुक्त नगरसेवकांना अपमानास्पद वागणुक देतात. नगरसेवकांना दोन लाख रुपयांचा निधीही देत नाहीत. असे वक्तव्य महापौर रंजना भानसी यांनी केले. राजकीय नेते, नगरसेवक विरुध्द नगरीक अशी विभागणी झाल्याचे चर्चा आहे. 

त्यावरुन अविश्‍वासाची चर्चा सुरु होताच नेहेमी पुढे राहणाऱ्या काही कार्यकर्त्यांनी आयुक्तांना पाठींबा दिला. त्यासाठी सोशल मिडीयावर अनेक लोक सक्रीय झाले. शासकीय विश्रामगृहावर काहींनी बैठक घेऊन पाठींबा दिला. 

आयुक्त मुंढे यांनी शहरात ऑनलाईन तक्रारींसाठी ऍप सुरु केला. वॉक वीथ कमिश्‍नर या उपक्रमात अनेक वर्षे रेंगाळलेले नागरीकांचे काही प्रश्‍न त्यांनी चुटकीत सोडवले. त्याचबरोबर अवाजवी अपेक्षा करणाऱ्यांना सर्वांसमक्ष खडसावले. त्यामुळे त्याची चर्चा झाली. सोशल मिडीयावर एक मोठा गट आयुक्तांच्या समर्थनार्थ तयार झाला. सोशल मिडीयातुन नगरसेवकांवर त्यांचा भडीमार आहे. वॉक वीथ कमिश्‍नर उपक्रम करणाऱ्या आयुक्त तुकाराम मुंढेंसाठी येत्या शुक्रवारी (ता.31) नागरीक आता "वॉक वीथ कमिश्‍नर' उपक्रम करणार आहेत. थोडक्‍यात सोशल मिडीयावर सध्या फक्त #नाशिकफॉरमुंढे हॅशटॅग बोलतोय.

संबंधित लेख