Nashik Chandwad Program Chagan Bhujbal Refutes Charges | Sarkarnama

भुजबळ म्हणतात...माझ्यावरचे आरोप म्हणजे सहा फुटाच्या म्हशीला सोळा फुटाचे रेडकू

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 26 जुलै 2018

काँग्रेसचे माजी आमदार शिरीष कोतवाल यांच्या वाढदिवसानिमित्त चांदवड येथे झालेल्या कार्यक्रमात भुजबळ यांच्या हस्ते कोतवाल यांचे अभिष्टचिंतन कार्यक्रम झाला. यावेळी जिल्ह्यातील विविध राजकीय नेते उपस्थित होते. भुजबळ यांनी यावेळी आपल्या खास शैलीत विरोधकांचा राजकीय समाचार घेतला. 

नाशिक : नवी दिल्लीत महाराष्ट्र सदनाचे कंत्राट शंभर कोटीचे होते. त्यात 850 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा दावा तपास यंत्रणा करतात. त्यामुळे ही एक वेगळीच नवलाई आहे. थोडक्‍यात काय तर माझ्यावर आरोप म्हणजे सहा फुटाच्या म्हशीला सोळा फुटाचं रेडकू... हे टिकेल कसे? असे विधान माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी येथे केले. 

काँग्रेसचे माजी आमदार शिरीष कोतवाल यांच्या वाढदिवसानिमित्त चांदवड येथे झालेल्या कार्यक्रमात भुजबळ यांच्या हस्ते कोतवाल यांचे अभिष्टचिंतन कार्यक्रम झाला. यावेळी जिल्ह्यातील विविध राजकीय नेते उपस्थित होते. भुजबळ यांनी यावेळी आपल्या खास शैलीत विरोधकांचा राजकीय समाचार घेतला. 

ते म्हणाले, ''सरकार म्हणते महाराष्ट्र सदन अतिशय सुंदर. जर ते सुंदर तर मग बांधणारा मात्र 'अंदर'. सगळे काही सुडाचे राजकारण सुरु आहे. कर्जापोटी शेतकरी आत्महत्या करीत आहेत. जीएसटी मुळे व्यापारी आत्महत्या करीत आहेत. ही वाईट स्थिती बदलावी लागेल. भाकरी फिरवावी लागेल. नवे सरकार राज्यात आणावे लागेल." कारागृहात गेल्यावर मला आपले कोण? परके कोण? काहीच समजत नव्हते. आता सगळे कळले आहे. कितीही दबाव आणला तरी गप्प बसणार नाही. जिथे जाईल तिथे बोलणारच, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. 

ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे, आमदार किशोर दराडे, माजी आमदार जयंत जाधव, जिल्हा परिषद सदस्या भारतीताई पवार, डॉ. सयाजीराव गायकवाड आदींनी भुजबळ यांचे स्वागत केले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख