nashik bjp crime | Sarkarnama

नाशिकमध्ये भाजपला गुन्हेगारीचे ग्रहण? 

सरकारनामा ब्युरो 
बुधवार, 12 जुलै 2017

नाशिक ः सराईत गुंडाच्या खून प्रकरणात भाजपचे नगरसेवक हेमंत शेट्टी यांना पोलिसांनी अटक केली. आता पक्षाच्या महिला नगरसेविकेच्या पतीसह दोघांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले. त्यामुळे महापालिका पोटनिवडणूकीपासून भाजपला लागलेले गुन्हेगारीचे ग्रहण अद्याप सुटलेले नाही. पक्षाच्या वरिष्ठांनी नगरसेवक व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना गुन्हेगारांपासून दूर राहण्याचे संकेत दिले आहेत. 

शहरातील संजयनगर भागातील सराईत गुन्हेगार जालींदर उगलमुगले उर्फ ज्वाल्या खून प्रकरणात गेल्या महिन्यात पोलिसांनी काही संशयीतांना अटक केली. त्यांनी दिलेल्या माहितीनूसार त्या खूनाचा सूत्रधार म्हणून नगरसेवक हेमंत शेट्टी यांना पोलिसांनी गेल्या आठवड्यात अटक केली होती. त्याला न्यायालयाने जामीन फेटाळला. कारागृहात रावनगी केली. यामध्ये अवैध व्यावसायातील वाटमीवरुन हा खून झाला होता. त्यामुळे पक्षाचा एक नगरसेवक गुन्हेगारीसाठी अटक झाली. दोन दिवसांपूर्वी किरण निकम हत्या प्रकरणातील संशयीत आरोपींना सोशल मिडीयावर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याने दहा जणांची चौकशी पोलिसांनी सुरु केली आहे. यामध्ये भाजपच्या नगरसेवकासह मनसेच्या नगरसेविकेच्या पतीचाही समावेष आहे. त्यामुळे राजकीय पक्ष, गट आणि गुन्हेगारी यांची संबंध चर्चेत आले आहेत. 

सत्ताधारी भाजपच्या दोघांचा समावेष आहे. महापालिकेच्या पोटनिवडणूकीत नगरसेवक पवन पवार यांना प्रवेश दिल्याने शहरात त्याविरोधात नाराजी पसरली होती. आता पुन्हा एकदा 'पार्टी वीथ डिफरन्स' अशी प्रतिमा असलेला भाजप त्याच कारणाने पुन्हा एकदा चर्चेत आला. त्यामुळे गुन्हेगारांच्या ग्रहनातून सुटका करण्यासाठी नेते, पदाधिकारी व नगरसेवकांनी दक्षता घ्यावी. सोशल मिडीयावर प्रकट होतांना काळजीपूर्वक तसेच वादग्रस्त लोकांपासून अलिप्त राहण्याच्या सूचना वरिष्ठ नेत्यांनी दिल्या. त्यामुळे भाजपचे अनेक पदाधिकारी सोशल मिडीया, व्हाटस्‌ऍप वरुन 'लेफ्ट' होऊ लागले आहेत.

संबंधित लेख