Nashik All Party agitation on Jaikwadi Water issue | Sarkarnama

नाशिकमध्ये विरोधी पक्षांचे रामकुंडात उतरुन आंदोलन

सरकारनामा ब्युरो 
बुधवार, 24 ऑक्टोबर 2018

मराठवाड्यातील दुष्काळ निवारणासाठी नाशिक व नगर जिल्ह्यातील धरणांतील 8.99 टीएमसी पाणी जायकवाडी धरणात सोडण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याची कार्यवाही लगेचच केली जाणार आहे. यासंदर्भात नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. आज यासंदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर तातडीने सुनावणीस न्यायालयाने नकार दिला. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षासह विविध राजकीय पक्षांतर्फे नेते, कार्यकर्त्यांनी रामकुंडात उतरुन आंदोलन केले. 

नाशिक : नाशिकचे पाणी राजकीय मुद्द्यावर चांगलेच तापले आहे. आज शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, माकप यांसह विविध पक्षाच्या नेत्यांनी रामकुंडात उतरुन सरकारविरोधात आंदोलन केले. जायकवाडी धरणात पाणी सोडण्यास त्यांनी विरोध केला. यावेळी पालकमंत्र्यांच्या विरोधातही घोषणा देण्यात आल्या. विविध भागातून धार्मिक विधींसाठी आलेल्या नागरिकांचा मात्र या आंदोलनाने खोळंबा झाला. 

मराठवाड्यातील दुष्काळ निवारणासाठी नाशिक व नगर जिल्ह्यातील धरणांतील 8.99 टीएमसी पाणी जायकवाडी धरणात सोडण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याची कार्यवाही लगेचच केली जाणार आहे. यासंदर्भात नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. आज यासंदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर तातडीने सुनावणीस न्यायालयाने नकार दिला. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षासह विविध राजकीय पक्षांतर्फे नेते, कार्यकर्त्यांनी रामकुंडात उतरुन आंदोलन केले. 

यावेळी कार्यकर्त्यांनी राज्य शासनाचा निषेध केला. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन नाशिकचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे त्यांनी नाशिकच्या हिताकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करुन त्याबाबत संतप्त प्रतिक्रीया व्यक्त करण्यात आल्या. माजी खासदार देविदास पिंगळे, महापालिकेचे विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विजय करंजकर, नगरसेवक विलास शिंदे, कविता कर्डक, माजी नगरसेवक राजेंद्र बागूल, सुरेश मारु, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे आदींसह अनेक कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. 

सरकारनामा दिवाळी अंक- 2019 ची राजकीय स्थिती जाणून घेण्यासाठी वाचायलाच हवा - अंक नोंंदणीसाठी येथे क्लिक करा

संबंधित लेख