nashik | Sarkarnama

नाशिकमध्ये गारपिटीने पिकांचे नुकसान 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 30 एप्रिल 2017

नाशिक : रविवारी दुपारी दोनपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह सुरू झालेल्या गारपिटीने जिल्ह्यात पिकांचे नुकसान झाले. गारपीट, वीज आणि घर पडल्याने देवळा तालुक्‍यात 8 जण जखमी झाले. सिन्नर, देवळा, सटाणा भागातील पिकांवर गारांचे थर साचले होते. 

सिन्नर. नामपूर, देवळा तसेच पांढुर्ली तसेच बेज मंडलातील गावांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. इतर भागात केवळ वातावरण बदलासह तुरळक स्वरूपाच्या सरी पडल्या. देवळ्यासह काही भागात गारांसह आलेल्या मुसळधार पावसाने अक्षरशः: झोडपून काढले. डाळिंब, द्राक्ष बागायती पिकांच्या शेतकऱ्यांची गाळण उडाली. 

संबंधित लेख