माथाडीचे युवा नेते नरेंद्र पाटील भाजपतर्फे साताऱ्याच्या मैदानात 

माथाडीचे युवा नेते नरेंद्र पाटील भाजपतर्फे साताऱ्याच्या मैदानात 

मुंबई : सातारा लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून माथाडी कामगारांचे युवा नेते आणि माजी आमदार नरेंद्र पाटील यांचे नाव पुढे आले असून त्यांच्या नावावर शिक्कामार्तब होण्याची शक्‍यता आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते असलेले पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. 

सातारा,वाई, कोरेगाव, पाटण या भागावर पाटील यांची चांगली पकड आहे. ते मुंबईत असले तरी साताऱ्यांशी त्यांचा संपर्क आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातून बाहेर पडल्यानंतर पाटील यांना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष करण्यात आले होते. पाटील हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासू गटातील ओळखले जातात. 

2014 ला सातारा मतदार संघ हा आरपीआयला दिला होता मात्र, आता हा मतदारसंघ भाजपकडे राहणार असल्याचे सूत्रांची माहिती आहे. राष्ट्रवादीकडून उदयनराजे हे निवडणूक लढणार असतील तर त्यांच्याविरोधात मैदानात कोणाला उतरवायचे याची चर्चा भाजपमध्ये गेल्या काही दिवसापासून सुरू होती. 

आता नरेंद्र पाटील हे उदयनराजेंविरोधात मैदानात जर उतरले तर लढतीत रंग येणार आहे. सातारा म्हणजे ओन्ली उदयनराज असे समजले जाते.उदयनराजेंविरोधात लढण्यास सहजा कोणी तयारही होत नाही. मात्र भाजपने नरेंद्र पाटलांना मैदानात उतरविण्याची तयारी केल्याचे समजते. 


 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com