narendra patil about jayant patil | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

पुणे : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दिनांक 21 फेब्रवारी रात्री 8 वाजता धनगर समाजाच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांना भेटणार.'

माझ्या वडिलांच्या नावाच्या महामंडळाला जयंत पाटील 'तुकडा' समजतात, ही त्यांची चूक! 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 6 सप्टेंबर 2018

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे मोठे नेते आहेत. त्यांच्याविषयी माझ्या मनात आदर आहे. पण त्यांनी माथाडी कामगारांच्या नेत्यांना किरकोळ समजणे हे चुकीचे आहे. त्यांना मी योग्य वेळी त्याचे उत्तर देईन, असे माजी आमदार आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी म्हटले आहे. 

सातारा : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे मोठे नेते आहेत. त्यांच्याविषयी माझ्या मनात आदर आहे. पण त्यांनी माथाडी कामगारांच्या नेत्यांना किरकोळ समजणे हे चुकीचे आहे. त्यांना मी योग्य वेळी त्याचे उत्तर देईन, असे माजी आमदार आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी म्हटले आहे. 

महामंडळाच्या तुकड्यासाठी नरेंद्र पाटील यांनी राष्ट्रवादी सोडली, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली होती. यावर नरेंद्र पाटील म्हणाले, अण्णासाहेब पाटील यांच्या नावाने असलेल्या महामंडळाला त्यांनी किरकोळ समजले, येथेच त्यांची चुक झाली आहे. जयंत पाटील हे मोठे नेते आहेत, त्यांच्याविषयी माझ्या मनात आदर आहे. पण त्यांनी माथाडी कामगारांच्या नेत्यांना त्यांनी किरकोळ समजणे हे चुकीचे आहे. त्यांना मी योग्य वेळी त्याचे उत्तर देईन. 

संबंधित लेख