narendra patil about devendra fadavnis | Sarkarnama

फडणवीसांनीच मला महामंडळ दिलयं, बाकीचा निर्णयही तेच घेतील : नरेंद्र पाटील 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 6 सप्टेंबर 2018

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच मला हे महामंडळ दिलं आहे आणि माझ्याबाबत बाकीचा निर्णयही तेच घेतील, असे मत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केले. 

सातारा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच मला हे महामंडळ दिलं आहे आणि माझ्याबाबत बाकीचा निर्णयही तेच घेतील, असे मत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केले. 

महामंडळावर नियुक्ती झाली, राष्ट्रवादीचा राजीनामा दिला आता पुढची भूमिका काय, असे विचारले असता नरेंद्र पाटील म्हणाले, पक्षात जाण्यापेक्षा चांगल्या विचाराने महामंडळ नंबर एकवर आणून दाखवायचे आहे. त्याचा फायदा माथाडी कामगारांपर्यंत चांगल्या प्रकारे करुन देण्यावर भर राहणार आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी जे विषय मांडलेले आहे. त्याबाबत वेळोवेळी शासन निर्णय काढलेले आहेत, पण त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यावर माझा भर राहणार आहे, असे त्यांनी सांगितले. 

तुम्ही भाजपच्या वाटेवर आहात असे म्हणता येईल का, यावर ते म्हणाले, भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी मला हे महामंडळ दिले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मला तुम्ही बिनधास्त काम करा, पुढे बघू काय करायचे ते. आपल्याला आताच घाई नाहीये, असे सांगितले आहे. समाजाचे प्रश्‍न घेऊन पुढे जावा आणि आम्ही जे काही केलंय ते जनतेपर्यंत पोहोचवा.

आमच्या अधिकाऱ्यांकडून काही चुकीचा झाल्या असतील तर त्या सांगा आम्ही त्या दुरूस्त करू. मराठा समाजाला भाजप पक्षच न्याय देणार आहे. त्यासाठी तुम्ही काम करा, असे सांगितले आहे. त्यामुळे बाकीचा निर्णय तेच घेतील. 

संबंधित लेख