narendra modi's vc with booth level activist | Sarkarnama

बारामतीत स्वत: मोदींनी लक्ष घातले, यंदा 'कमळ' चिन्हाचा उमेदवार लढणार!

मिलिंद संगई  
शनिवार, 19 जानेवारी 2019

बारामती : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या बुधवारी (ता. 23) बारामती लोकसभा मतदारसंघातील बूथ प्रमुखांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. येथील कविवर्य मोरोपंत सभागृहात दुपारी दोन ते चार या वेळेत मोदी मतदारसंघातील प्रमुख बूथ कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. 

भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे व अँड. नितीन भामे यांनी या बाबत माहिती दिली. 

बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभा मतदारसंघातील बूथ कार्यकर्त्यांशी लोकसभा निवडणूकीच्या पूर्वतयारीबाबत संवाद साधून मार्गदर्शन करणार आहेत. खुद्द पंतप्रधानच बूथ कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याने भाजपच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे. महाराष्ट्रात केवळ बारामती लोकसभा मतदारसंघाचीच या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या उपक्रमासाठी निवड करण्यात आली असल्याने भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी या बाबत जोरदार तयारी सुरु केली आहे. 

पंतप्रधानांच्या समोर जाताना कार्यकर्त्यांनी पुरेशा तयारीने जावे या सह मतदारसंघाचा व्यवस्थित अभ्यासही करण्यास कार्यकर्त्यांना सांगण्यात आले आहे. बारामतीत होणा-या या व्हिडीओ कॉन्फरन्सिंग संवादाच्या वेळेस पालकमंत्री गिरीश बापट, जिल्हाध्यक्ष बाळा भेगडे, संघटनमंत्री रवी अनासपुरे हेही उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान यंदाच्या निवडणूकीत कमळाच्याच चिन्हावर लढणारा उमेदवार द्यावा अशी मागणी भाजपच्या सर्वच पदाधिका-यांनी एकमुखाने रावसाहेब दानवे यांच्याकडे बारामतीतील बैठकीत केल्याची माहिती मिळाली आहे. इतर उमेदवारांना पाठिंबा देण्यापेक्षाही कमळाच्या चिन्हावरील उमेदवाराचा प्रचार आम्ही जोमाने करु असे कार्यकर्त्यांनी दानवे यांना सांगितले. कार्यकर्त्यांची ही भावना पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचविण्याची ग्वाही दानवे यांनी दिल्याचेही समजते.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख