narendra modi foreign tour expinditure | Sarkarnama

परदेश दौऱ्यांसाठी मोदींवर 2021 कोटी, तर डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर 1346 कोटी खर्च 

वृत्तसंस्था
शनिवार, 29 डिसेंबर 2018

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी पंतप्रधान बनल्यापासून आजपर्यंत त्यांच्या परदेश दौऱ्यासाठी तब्बल 2021 कोटी रूपये खर्च करण्यात आला आहे. डॉ. मनमोहनसिंग यांच्या दौऱ्यासाठी हाच खर्च 1346 कोटी झाल्याची माहिती पुढे आली आहे. 

पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यासाठी आलेल्या खर्चाची माहिती राज्यसभेत जाहीर करण्यात आली आहे. तशी माहिती "पीटीआय' या वृत्तसंस्थेने दिली आहे. मोदी हे 2014 मध्ये देशाचे पंतप्रधान बनले. म्हणजेच 2014 पासून ते आजपर्यंत चार वर्षात मोदींनी जे परदेश दौरे केले आहेत त्यासाठी 2021 कोटी रुपये इतका खर्च झाला आहे. 

परराष्ट्र राज्यमंत्री व्ही.के.सिंह यांना विचारण्यात आलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले, की मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी सहा प्रमुख देशांना भेटी दिल्या. या भेटीसह आतापर्यत त्यांचे अनेक दौरे झाले आहेत. त्यासाठी हा खर्च आला आहे. तसेच मोदी सरकारच्या विविध विकास योजनांच्या जाहीरातीसाठी गेल्या चार वर्षात 5245 कोटीहून अधिक खर्च झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

डॉ. मनमोहनसिंग हे "यूपीए' दोनचे पंतप्रधान बनल्यानंतर म्हणजे 2009 ते 2014 पर्यंत त्यांनीही अनेक दौरे केले. त्यांच्या परदेशी दौऱ्यांसाठी 1346 कोटी रूपये खर्च झाले आहेत. मोदींनी आतापर्यंत 48 परदेश दौरे केले त्यापैकी त्यांनी 55 देशांना भेटी दिल्या आहेत. 
 
संबंधित लेख