पंतप्रधान मोदी हे हुकूमशहा : राहुल गांधी 

छत्तिसगडमध्ये कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांवर झालेला हल्ला राज्यातील जनता विसरणार नाही. -राहुल गांधी
Narendra_modi_rahul_gandhi.
Narendra_modi_rahul_gandhi.

नवी दिल्ली  :  हुकूमशाही हेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जीवितकार्य बनले असल्याची टीका कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी केली.

छत्तिसगडमध्ये कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांवर झालेला हल्ला राज्यातील जनता विसरणार नाही. राजकीय सुडापोटी अशा प्रकारचे हल्ले केले जात असल्याचा आरोपही गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून केला.

छत्तिसगडमधील रमणसिंह यांच्या सरकारमधील मंत्री अमर अगरवाल यांच्या घरासमोर कॉंग्रेसचे कार्यकर्ते निदर्शने करत होते. मात्र त्यांच्यावर पोलिसांनी केलेल्या लाठीमारात सात कार्यकर्ते जखमी झाले. या घटनेचा व्हिडिओ ट्विट करत गांधी यांनी आज छत्तिसगडमधील रमणसिंह सरकारसह केंद्रातील मोदी सरकारवरही टीकास्त्र सोडले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com