narendra modi | Sarkarnama

मोदींना जवानाच्या पत्नीने पाठविला 56 इंचाचा 'ब्लाऊज'

वृत्तसंस्था
शनिवार, 13 मे 2017

नवी दिल्ली - पाकिस्तानी सैन्याकडून भारतीय जवानांवर होत असलेल्या हल्ल्यांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवृत्त जवानाच्या पत्नीने पत्नीने चक्क 56 इंचाचा ब्लाऊज पाठविला आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान मोदींनी 56 इंच छातीचा उल्लेख केला होता.

हरियाणातील फतेहबादमधील निवृत्त जवान धरमवीर सिंग यांच्या पत्नी सुमन सिंग यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून त्यांना 56 इंचाचा ब्लाऊज पाठविला आहे. त्यांनी पत्रातून भाजपकडून दिलेल्या आश्वासनांची आठवण मोदींना करून दिली आहे. दहशतवाद्यांकडून जवानांवर सातत्याने होणारे हल्ले, हुतात्मा जवानांच्या मृतदेहाची होणारी विटंबना यावरून आणखी परिस्थिती खराब झाल्याचे सुमन सिंग यांनी लिहिले आहे. सुमन सिंह यांनी पत्रकार परिषद बोलवून ही माहिती दिली आहे.

मोदींना जाब विचारणाऱ्या या पत्रात लिहिले आहे, की भाजप सत्तेत आल्यास पाकिस्तान भारताकडे वाकड्या नजरेने पाहाण्याची हिंमत करणार नाही, असे आश्वासन दिले होते. पण आता परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. महिला त्यांच्या मुलांना, भावांना व पतीला देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर पाठवतात. आपल्या जवळच्या व्यक्तीचा शिरच्छेद व्हावा म्हणून नाही. आता कुठे गेली तुमची 56 इंचाची छाती. पंतप्रधानांनी जवानांना सीमेवर कारवाई करण्याची परवानगी द्यायला हवी. आपल्या जवानांचे हात बांधले गेलेले आहेत, हे दुर्दैवी आहे.

संबंधित लेख