narendra modi | Sarkarnama

तरुणाईने नवीन गोष्टी आत्मसात कराव्यात: पंतप्रधान

वृत्तसंस्था
रविवार, 30 एप्रिल 2017

नवी दिल्ली : परीक्षा संपून आता मुलांना सुट्या लागल्या आहेत. सर्वच जण कसे आनंदी आहेत. मात्र मला देशातील सर्वच तरुराईविषयी गेल्या काही दिवसापासून चिंता सतावत आहे. आजच्या तरुणाईला आरामात जगण्याची सवय लागली आहे. खरे त्यांनी आई-वडिलांच्या पांघरूणाबाहेर यायला हवे. सुटीत काहीतरी नवीन करण्याबरोबरच जाणूनही घेण्याची गरज आहे. सुटीच्या काळात नवलाईचा शोध घ्या असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. 

आजची मन की बात ही विशेषत: देशभरातील तरुणांसाठी होती. सुटी मजेत घालविण्यासाठी काही तरी नवीन शोधण्याचा आणि जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे आवाहन करून मोदी म्हणाले, "" युवकांनी नवीन ठिकाणी जावे, नवीन अनुभव घ्यावा. आरक्षण न करता एखादा प्रवास रेल्वेच्या द्वितीय श्रेणीच्या डब्यातून करावा. यातील प्रवाशांशी चर्चा करा, त्यांच्या अडचणी जाणून घ्या, पाहा कसं वाटतं ते. एका सांयकाळी गरीब वस्तीतील मुलांबरोबर खेळण्यासाठी जा. त्यांचा आनंद पाहा. असे अनुभव घेतच आपले जीवन घडते. यातूनच नवीन शिकायला मिळते. हाच अनुभव आयुष्यात कामाला येऊ शकतो.'' 

तंत्रज्ञानाने जागतिक अंतर कमी झाले असले तरी कुटुंबातील अंतर मात्र वाढले आहे. एकाच घरातील सहा लोक एकाच खोलीत असून ते एकमेकांपासून दूर असतात, याची आपल्याला चिंता असल्याचे स्पष्ट करून मोदी म्हणाले, की जीवनात खूप काही करण्याचे स्वप्न पाहिले पाहिजे. तंत्रज्ञानापासून दूर जाऊन संगीतातील एखादे नवे वाद्य शिकावे, भाषा शिकावी, पोहायला येत नसेल तर ते शिकावे. अशा गोष्टींमुळे तुमच्यातील संवेदना जागृत राहतात. 

भीम ऍपसाठीही आवाहन 
या सुटीत युवकांनी इतरांना भीम ऍप वापरण्याबाबत प्रोत्साहित करावे, त्यांना त्याचे ज्ञान द्यावे. या माध्यमातून त्यांना उत्पन्न मिळवण्याचीही संधी मिळेल, असे त्यांनी सांगितले. या वेळी त्यांनी बदलत्या हवामानावरही भाष्य केले. तसेच एक मे रोजी महाराष्ट्र व गुजरातच्या स्थापनादिनाच्या शुभेच्छाही दिल्या. संत रामानुजाचार्य यांच्या एक हजाराव्या जयंतीनिमित्त डाक तिकिटाचे प्रकाशन करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. 1 मे रोजीच्या कामगार दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतानाच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा बसवेश्वर यांनी समाजजागृतीसाठी दिलेल्या योगदानाची आठवणही त्यांनी युवकांना करून दिली.  

संबंधित लेख