narendra modi | Sarkarnama

तोंडी तलाकचे मोदींकडून राजकारण : कॉंग्रेस

वृत्तसंस्था
रविवार, 30 एप्रिल 2017

नवी दिल्ली : तोंडी तलाकच्या मुद्याचे राजकारण करू नये असे आवाहन करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच राजकारण करत असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे. 

नवी दिल्ली : तोंडी तलाकच्या मुद्याचे राजकारण करू नये असे आवाहन करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच राजकारण करत असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे. 

तोंडी तलाकच्या मुद्याचे राजकारण होणार नाही याची काळजी मुस्लिम समुदायाने घ्यावी, असे आवाहन शनिवारी संत बसवेश्‍वर यांच्या जयंतीनिमित्त बोलताना मोदी यांनी केले होते. या पार्श्‍वभूमीवर बोलताना कॉंग्रेस नेते मधु गौड याक्षी म्हणाले, "कधी ते (मोदी) दफनभूमी-स्मशानाबद्दल बोलतात तर कधी दिवाळी-रमजानबद्दल आणि आता ते तोंडी तलाकबद्दल बोलत आहेत. तुम्ही केवळ एका धर्माचे आणि समुदायाचे पंतप्रधान नसून संपूर्ण देशाचे पंतप्रधान आहात. त्यामुळे तुम्ही सर्वात आधी देशाचा विचार करायला हवा. कृपया देशात फूट पाडणाऱ्या मुद्याचे राजकारण करू नका.' 

अशाच प्रकारच्या प्रतिक्रिया सीपीआय नेते डी. राजा यांनीही व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले, "तोंडी तलाकच्या मुद्याचे कोणीही राजकारण करू नये. मुस्लिम समाजात असेही काही जण आहेत की त्यांना तोंडी तलाक मान्य नाही. मूळ मुद्दा महिलांचे सक्षमीकरण, लैंगिक समानता हा आहे. पंतप्रधानांनी सर्व धर्म आणि समुदाय लक्षात घेऊन मोठ्या मुद्यांवर बोलायला हवे.'  

 
 

संबंधित लेख