narendra modi | Sarkarnama

"ओडिशात सत्तांतर हेच भाजपचे लक्ष्य'

वृत्तसंस्था
शनिवार, 15 एप्रिल 2017

भुवनेश्‍वर : भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीस येथे आज सुरूवात झाली असून ओडिशामध्ये सत्तांतर हेच पक्षाचे लक्ष्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे अध्यक्ष अमित शहा हे संध्याकाळपर्यंत बैठकीला उपस्थित राहणार असून या दोघांच्या उपस्थित पुढील व्यूहरचना ठरविण्यात येणार आहे. 

भुवनेश्‍वर : भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीस येथे आज सुरूवात झाली असून ओडिशामध्ये सत्तांतर हेच पक्षाचे लक्ष्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे अध्यक्ष अमित शहा हे संध्याकाळपर्यंत बैठकीला उपस्थित राहणार असून या दोघांच्या उपस्थित पुढील व्यूहरचना ठरविण्यात येणार आहे. 

येथील भाजपच्या सूत्रांनी सांगितले, की ओरिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक हे गेल्या सतरा वर्षापासून सत्तेवर आहेत. पण, म्हणावा तसा राज्याचा विकास झाला नाही. संपूर्ण देशातच आता मोदी लाट आली आहे. मोदींच्या नेतृत्वावर लोकांचा विश्‍वास निर्माण झाला आहे. नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला चांगले यश मिळाल्याने पटनाईक यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. राज्यात भाजपला मिळालेल्या यशाने नेत्यांचा विश्वास बळावला आहे. त्याचाच एक भाग म्हणून आतापासूनच राज्यात मोर्चेबांधणी करण्यास सुरवात करण्यात येणार आहे. उत्तरप्रदेश, उत्तराखंड, मणिपूरनंतर भाजपचे लक्ष्य आहे ते ओरिसा. 

पटनाईक हे 2000 सालापासून सत्तेवर आहेत. त्यांचा लोकांवर इतका प्रभाव होता की कोणताही पक्ष त्यांच्या बिजू जनता दलाबरोबर लढू शकला नाही. एकतर्फी विजय खेचून आणणारे मुख्यमंत्री म्हणून नवीन पटनाईक यांच्याकडे पाहिले जात होते. मात्र मोदी लाटेमुळे त्यांचीही हवा ओसरू लागली आहे. ओडिशा विधानसभेत एकूण 147 सदस्य आहेत. सत्तेवर येण्यासाठी पक्षाला 74 सदस्यांची गरज आहे. मोदी यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. त्यांचे आगमन होताच त्यांना 74 फुलांचा हार पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या हस्ते घालून स्वागत करण्यात येणार आहे. ओरिसात गरिबीचे प्रमाण अधिक असून तरुणांच्या हाताला काम नाही. केंद्र सरकार राज्यासाठी खास योजना राबविणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली. 

संबंधित लेख