narendra giri attack on shivsena ayodya issue | Sarkarnama

शिवसेना राजकारणासाठी अयोध्येत कार्यक्रम करीत आहे, आखाडा परिषदेच्या गिरींची टीका 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 21 नोव्हेंबर 2018

पुणे : अयोध्येतील राम मंदिर उभारण्यासाठी शिवसेना आक्रमक झाली असली तरी अयोध्येतील महंतांनी शिवसेनेचे निमंत्रण नाकारले आहे. रामापेक्षा विश्‍व हिंदु परिषद आणि शिवसेनेसारख्या संघटनाना राजकारणासाठी अयोध्येत कार्यक्रम करीत असल्याचा गंभीर आरोप नरेंद्र गिरी यांनी केला आहे. 

पुणे : अयोध्येतील राम मंदिर उभारण्यासाठी शिवसेना आक्रमक झाली असली तरी अयोध्येतील महंतांनी शिवसेनेचे निमंत्रण नाकारले आहे. रामापेक्षा विश्‍व हिंदु परिषद आणि शिवसेनेसारख्या संघटनाना राजकारणासाठी अयोध्येत कार्यक्रम करीत असल्याचा गंभीर आरोप नरेंद्र गिरी यांनी केला आहे. 

येत्या 24 नोव्हेबररोजी अयोध्येत शिवसेनेतर्फे पुजेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे, प्रवक्ते संजय राऊत, खासदार राजन विचारे आदी नेते अयोध्येत तळ ठोकून आहेत. उद्धव ठाकरेंच्या उपस्थित होणाऱ्या कार्यक्रमासाठी साधुसंताना आणि आखाडा परिषदेच्या साधुंनाही निमंत्रण देण्यात आले आहे. मात्र शिवसेनेचे हे निमंत्रण गिरी यांनी नाकारताना शिवसेनेला झटका दिला आहे. 

अयोध्येत राममंदिर व्हावे असे जर हिंदुत्ववादी संघटनाना प्रामाणिकपणे वाटत असेल तर शिवसेना, विश्‍व हिंदु परिषदेसारख्या संघटना एकत्र येऊन कार्यक्रम का घेत नाहीत असा संतप्त सवालही गिरी यांनी केला आहे. 

दरम्यान, शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी सांगितले, की अयोध्येत ज्या दिवशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे येतील तेव्हा देशाला जो काही संदेश जायचा आहे तो जाईलच. केंद्रात मोदी सरकारला बहुमत आहे. सरकारने राम मंदिर निर्माणसाठी कायदा करावा. गेल्या पंचवीस वर्षात शिवसेनेला राम मंदिर का आठवले नाही असे पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, पंचवीस वर्षाचा मुद्दा येथे लागू होत नाही. यापूर्वी भाजप सरकारला पूर्ण बहुमत नव्हते. आता सरकार बहुमतात आहे. ट्रिपल तलाक आणि इतर मुद्यावर जर तातडीने कायदा होतो तर राम मंदिरासाठी का होत नाही ? राम मंदिरासाठी शिवसेना आग्रही असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, ठाकरेंना पाठिंबा देण्यासाठी मुंबईतून वारकऱ्यांचा एक चमू आज अयोध्येकडे रवाना झाला आहे. 

संबंधित लेख